कराडमध्ये ७२ वर्षांच्या आजोबांची धाव!, पाच किमी अंतर ३२ मिनिटांत केले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:00 IST2026-03-06T15:59:53+5:302026-03-06T16:00:17+5:30

विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत त्यांची नातवंडे अरहान शेख आणि इनाया शेख यांनीही धावत स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.

72-year-old Dastgir Sheikh completed five kilometers in just 32 minutes at the RTO Run for Road Safety competition organized in Karad | कराडमध्ये ७२ वर्षांच्या आजोबांची धाव!, पाच किमी अंतर ३२ मिनिटांत केले पूर्ण

कराडमध्ये ७२ वर्षांच्या आजोबांची धाव!, पाच किमी अंतर ३२ मिनिटांत केले पूर्ण

कोपर्डे हवेली : वयाच्या ७२ व्या वर्षीही फिटनेस आणि उत्साह कायम ठेवत सर्वांना प्रेरणा देणारी कामगिरी कराड येथे आयोजित ‘आरटीओ रन फॉर रोड सेफ्टी’ स्पर्धेत पाहायला मिळाली. विद्यानगर सैदापूर येथील रहिवासी दस्तगीर शेख यांनी पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेत अवघ्या ३२ मिनिटांत हे अंतर पूर्ण केले. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत त्यांची नातवंडे अरहान शेख आणि इनाया शेख यांनीही धावत स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.

या स्पर्धेत दस्तगीर शेख हे सर्वात वयस्कर धावपटू ठरले. वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी दाखवलेली ऊर्जा आणि जिद्द सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि शिस्तबद्ध दिनक्रम यामुळेच अनेकांची शारीरिक क्षमता टिकून राहते. त्यांच्या या प्रेरणादायी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजमाध्यम तसेच विविधस्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. वय असले तरी ते मानण्यावर असते. हे शेख यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

सहाशे किलोमीटरचा प्रवास 

दस्तगीर शेख व्यायामच्या बाबतीत कायमच चर्चेत असतात. २०१९ ला ते मुंबई येथील उद्धव ठाकरे यांच्या शपथ विधीसाठी दुचाकीवरून सामाजिक कार्यकर्ते मोहन चव्हाण यांच्याबरोबर गेले होते. ३६ तासांत त्यांनी आरत परतचा एकाच वेळी सहाशे किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यावेळी कोपर्डे हवेली ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला होता.

मी दररोज नियमित व्यायाम करतो. संतुलित आहार घेतो आणि दिवसभर पुरेसे पाणी पितो. तसेच वेळोवेळी डोंगर-गडांची सैरही करतो. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. - दस्तगीर शेख, धावपटू

Web Title : कराड में 72 वर्षीय व्यक्ति ने 32 मिनट में 5 किमी दौड़ पूरी की!

Web Summary : कराड में 72 वर्षीय दस्तगीर शेख ने 32 मिनट में 5 किमी दौड़ पूरी की। उन्होंने अपने पोते-पोतियों के साथ दौड़ लगाई। उनका फिटनेस और समर्पण कई लोगों को प्रेरित करता है। वह नियमित व्यायाम और संतुलित आहार से अपना स्वास्थ्य बनाए रखते हैं, और एक बार बाइक से 600 किमी की यात्रा की थी।

Web Title : 72-year-old runs 5km in 32 minutes, inspires in Karad!

Web Summary : Dastagir Sheikh, 72, completed a 5km run in 32 minutes at Karad. He ran with his grandchildren. His fitness and dedication inspire many. He maintains his health through regular exercise and a balanced diet, and once traveled 600km by bike.