शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

६८ ठिकाणी राजे गट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2015 22:25 IST

फलटण : विरोधकांचीही अनेक ठिकाणी मुसंडी

फलटण : तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्ताधारी राजेगटाने वर्चस्व कायम राखले आहे. तर विरोधकांनीही अनपेक्षित मुसंडी मारत अनेक ठिकाणी जागा जिंकल्या. अनेक ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या साखरवाडीत राजेगटाने सत्ता मिळविली आहे. राजेगटाने ६८ तर विरोधकांनी १८ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींसाठी मतदान होऊन गुरुवारी मतमोजणी करण्यात आली. नवीन शासकीय गोदामात मतमोजणीला प्रारंभ झाला.साखरवाडी व कोळकी ग्रामपंचायतींच्या निवडणुका खरोखरच चुरशीच्या झाल्या. साखरवाडीत न्यू फलटण शुगर वर्क्सचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या सत्तेला हादरा देत परिवर्तन घडवित राजेगटाने सत्ता काबीज केली. राजेगटाला नऊ व पाटील गटाला आठ जागा मिळाल्या आहेत. रासपनेही तालुक्यात खाते उघडले आहे. ढवळ, साखरवाडी, हिंगणगाव, राजाळे, मुरुम, नांदल, शिंदेवाडी, फडतरवाडी येथे सत्तांतर झाले आहे. (प्रतिनिधी)साखरवाडीत गड आला; पण...साखरवाडीचे सरपंचपद खुले प्रवर्गासाठी असल्याने सर्वच सत्ता आपल्या घरात पाहिजे, अशी अपेक्षा ठेवून असलेल्यांना मतदार व खुद्द राजेगटातील अंतर्गत कार्यकर्त्यांनी पाडून जागा दाखवून दिली आहे. राजेगटाची येथे सत्ता आली; पण सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभ्या असलेल्या ‘त्या’ उमेदवाराला घरी बसावे लागल्याची चर्चा साखरवाडी परिसरात होती. प्रल्हादराव पाटील यांच्या गटाकडून राजेगटाने सत्ता खेचून आणली आहे.