6 lakh construction material stolen from Godavari | गोडावूनमधून ६ लाखांचे बांधकाम साहित्य चोरीस
गोडावूनमधून ६ लाखांचे बांधकाम साहित्य चोरीस

ठळक मुद्देगोडावूनमधून ६ लाखांचे बांधकाम साहित्य चोरीससातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद

सातारा : येथील नागेवाडी, ता. सातारा येथील गोडावूनमधून ६ लाख ३० हजार रुपये किमतीचे बांधकाम साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

प्रदीपकुमार कन्हैलाल गुप्ता (वय ३५, रा. शाहूनगर, गोडोली) हे प्रकाश कंन्स्ट्रक्शनचे मालक आहेत. नागेवाडी येथे त्यांचे गोडावून आहे.

अज्ञात चोरट्याने रविवारी रात्री गोडावूनमध्ये प्रवेश करून ट्रॅक्टरची ट्रॉली, जनरेटर, सेंन्ट्रींग प्लेट्स, टायर सेट, मोटार व्हायब्रेटर, पाण्याची मोटर, एक सेट केबल पॅनल असा सुमारे ६ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे


Web Title: 6 lakh construction material stolen from Godavari
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.