सातारा जिल्ह्यात ३७ मिलिमीटर पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 14:33 IST2022-07-14T14:33:15+5:302022-07-14T14:33:35+5:30
महाबळेश्वर, पाटण, जावळी आणि सातारा तालुक्यात अधिक पाऊस

सातारा जिल्ह्यात ३७ मिलिमीटर पाऊस
सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरू असून बुधवारपासून गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत ३७.०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३४७.०८ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. एक जूनपासूनचा विचार करता महाबळेश्वर, पाटण, जावळी आणि सातारा तालुक्यात अधिक पाऊस पडला आहे, तर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी १० पर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत एकूण आकडेवरी मिलिमीटरमध्ये अशी आहे.
सातारा - ४६.०३ (३४४.०५)
जावळी - ७४.०५ (५७४.०५)
पाटण - ५१.०२ (६१५.०९)
कऱ्हाड - १९.०९ (२५२.०८)
कोरेगाव - २७.०२ (१८८.०१)
खटाव - १४.०९ (१२२)
माण - ९.०१ ( १५४.०९)
फलटण - १० (१२४.०८)
खंडाळा - २६ (१८७.०३)
वाई - ३२.०५ (३३७.०७)
महाबळेश्वर - १७०.०४ (१४७४.०४)