शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३५ पोलिसांची धावपळ थांबणार!

By admin | Updated: April 20, 2015 00:12 IST

अतिरिक्त श्रमांची बचत : दौऱ्यावरील मंत्र्यांना मानवंदना बंद करण्याच्या निर्णयामुळे तपासासाठी अधिक वेळ

राजीव मुळ्ये - सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांना देण्यात येणारी मानवंदना यापुढे बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. यामुळे याकामी गुंतणारे तब्बल चौतीस जणांचे मनुष्यबळ तपासकामाकडे वळविणे शक्य होणार असून, दोन दिवस चालणारी धावपळ थांबणार आहे.मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाविषयी पोलिसांकडे अद्याप लेखी स्वरूपात कोणतेही आदेश आलेले नसले, तरी लवकरच ते प्राप्त होतील. तपास आणि बंदोबस्तासाठी उपलब्ध पोलीस बळाचा वापर होत असतानाच ‘व्हीआयपी’चा दौरा येतो आणि बरेच मोठे मनुष्यबळ या दौऱ्यात गुंतून राहते. पोलिसांना दौऱ्याच्या वेळी दुहेरी भूमिका बजावावी लागते. मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्री, अधिकाऱ्याला सुरक्षा देण्यासाठी जिल्ह्याच्या हद्दीपासून मनुष्यबळ पुरवावे लागते. शिवाय, जिल्ह्याच्या मुख्यालयात मानवंदना द्यावी लागते.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव पातळीवरील अधिकारी तसेच महानिरीक्षक आणि त्याहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मानवंदना देण्याची पद्धत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मानवंदना देताना पोलीस बँड उपस्थित असतो. कमीत कमी १८ पोलीस कर्मचाऱ्यांची तुकडी त्यांना मानवंदना देते. सहा जणांची एक रांग अशा तीन रांगा केल्या जातात. त्यांचे नेतृत्व एक अधिकारी करतो. शिवाय, पोलीस बँडचा ताफा १६ जणांचा असतो. म्हणजेच ३४ कर्मचारी आणि एक अधिकारी केवळ मानवंदनेच्या कामी रुजून पडतात. मंत्री किंवा अधिकाऱ्यांच्या मानवंदनेला पोलीस बँड उपस्थित नसतो. केवळ एक बिगूल वाजविला जातो आणि त्यासाठी एकच कर्मचारी लागतो.मानवंदना देण्यासाठी सराव असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक होत असली, तरी आदल्या दिवशी सराव केला जातो. याखेरीज कपड्यांना कडक इस्त्री करणे, बुटांना पॉलिश करणे या कामांतही कर्मचाऱ्यांचा वेळ जातो. मानवंदना देताना कर्मचाऱ्यांना मुख्य बेल्टवर आणखी एक खास बेल्ट लावावा लागतो. तोही तयार आदल्या दिवशीच करून ठेवावा लागतो. ‘व्हीआयपीं’च्या दौऱ्यावेळी होणारी एवढी सारी धावपळ या एकाच निर्णयामुळे थांबणार आहे. व्यूहात्मक सुरक्षा कायममानवंदनेखेरीज ‘व्हीआयपीं’ना दर्जानुसार सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते. झेड, झेड प्लस, एक्सवाय अशा दर्जांसाठी वेगवेगळे मनुष्यबळ लागते. यासाठीही कमीत कमी वीस पोलीस उपलब्ध करून द्यावे लागतात. याला ‘टॅक्टिकल सिक्युरिटी’ म्हणजेच व्यूहात्मक सुरक्षा असे म्हणतात. ही सुरक्षा यापुढेही सुरूच राहणार आहे. मात्र, मानवंदना (गार्ड आॅफ आॅनर) बंद झाल्यास किमान ३५ जणांची दोन दिवसांची धावपळ थांबणार आहे.