शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

खटाव तालुक्यात फुलल्या द्राक्ष बागा, २५० टन द्राक्ष युरोपच्या बाजारात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:22 IST

दुष्काळ, अवकाळी या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. या महाभयंकर परिस्थितीवर मात करण्यासाठी खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलवल्या. जीवाचे रान करून अगदी वेळेत म्हणजेच जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ४० कंटेनरमघून २५० टन द्राक्ष युरोपच्या बाजारात रवाना झाले आहेत.

ठळक मुद्दे२५० टन द्राक्ष युरोपच्या बाजारात रवाना खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी फुलवल्या द्राक्ष बागा

स्वप्नील शिंदे सातारा : दुष्काळ, अवकाळी या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. या महाभयंकर परिस्थितीवर मात करण्यासाठी खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलवल्या. जीवाचे रान करून अगदी वेळेत म्हणजेच जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ४० कंटेनरमघून २५० टन द्राक्ष युरोपच्या बाजारात रवाना झाले आहेत.जानेवारीच्या सुरुवातीला द्र्राक्षाचा अवघा एक कंटेनर युरोपकडे रवाना झाला होता. मात्र, महिन्याच्या अखेरपर्यंत कंटेनरची संख्या वाढत ४० पर्यंत पोहोचली. जिल्ह्णातील द्र्राक्ष हंगामाची सुरुवात अनेक अडथळ्यांतूनच झाली आहे. उन्हाळ्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली.

पाणी टंचाईच्या समस्येवर विविध उपाययोजना करून बागा जगविल्या. सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात बागांची छाटणी केल्यानंतर अवकाळी पाऊस पडला. त्यात ५५ टक्के बागांचे पावसाने नुकसान झाले. त्यानंतर हिवाळा असला तरी ढगाळ वातावरण आहे. या स्थितीत हवामानातील चढ-उतार सुरूच आहेत.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पहिल्यापासून संकटावर मात करण्याचा निर्धार ४१७ शेतकऱ्यांनी युरोप आणि आखाती देशांमध्ये निर्यात करण्यासाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली.खटाव परिसरात जम्बो सीडलेस, सोनाका, आरके सीडलेस, थॉमसन सीडलेस, तास गणेश व क्लोन आदी वाणांच्या द्राक्षाची निर्यात केली जाते. गेल्यावर्षी याच बागांमधील गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ पाडली होती. त्यामुळेच यंदा व्यापाऱ्यांची पावले द्राक्ष शेतीच्या बांधांवर वळाली आहेत.

शेतकऱ्यांनीही जीवाचे रान करून ४० कंटेनरमधून २५० टन द्राक्ष नेदरलँड, जर्मनी व दुबईत निर्यात केली. पुढील आठवड्यामध्ये साधारण ४० टन द्राक्ष निर्यात होणार आहेत.युरोपातील खरेदीदारांकडून भारतातील जम्बो सीडलेस, सोनाका, आरके काळ्या वाणांसोबत जास्त मागणी असते. यावर्षीही साधारण १०० ते १२० रुपये दर मिळत आहे. येत्या काळात मागणी वाढून शिवार सौद्यांचे प्रमाण वाढत जाणार आहे.

सध्या पहिल्या टप्प्यात मायणी मंडलातून नेदरलँड, जर्मनी, दुबई आदी देशांमध्ये द्राक्ष निर्यात करण्यात आले आहेत. पुढील काही दिवसांत आणखी निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे.- दिलीप दाभाडे, कृषी अधिकारी

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर