मेडिकलमधून २२ हजाराची रोकड लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:38 IST2020-12-12T21:37:12+5:302020-12-12T21:38:26+5:30
Crimenews, sataranews, police सातारा येथील सदर बाजारमधील श्री गणेश मेडिकल स्टोअर्समधून अज्ञात चोरट्याने २२ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना दि. १९ रोजी रात्री घडली.

मेडिकलमधून २२ हजाराची रोकड लांबवली
सातारा: येथील सदर बाजारमधील श्री गणेश मेडिकल स्टोअर्समधून अज्ञात चोरट्याने २२ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना दि. १९ रोजी रात्री घडली.
याबाबत प्रवीण शिवाजी ताटे (रा. शनिवार पेठ सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या मेडिकल स्टोअर्सचे शटर अज्ञात चोरट्याने उचकटून मेडिकल स्टोअरमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काउंटरमधील २२ हजाराची रोकड चोरट्याने लंपास केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी ताटे हे मेडिकल उघडण्यासाठी आले असता त्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मेडिकल परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची पोलीस तपासणी करत असून चोरटे लवकरच हाती सापडतील, असा विश्वास सातारा शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे.