शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे अधिकारी मालामाल

By admin | Updated: September 4, 2015 22:37 IST

ठेकेदाराच्या नावाखाली काम : बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा प्रताप

सांगली : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातर्फे पदाधिकारी, अधिकारी आणि सामान्य प्रशासन विभागाकडील फर्निचरचे काम सुरु आहे. स्वीय निधीतून चाळीस लाखांची तरतूद केली असून ठेकेदाराच्या नावावर काही अधिकारीच हे काम करीत असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला आहे. जिल्हा परिषदेतील अधिकारी सुशिक्षित बेरोजगार अभियंते, मजूर संस्थांच्या नावावर ठेके घेऊन लाखो रूपये उकळत आहेत. अधिकारीच ठेके घेत असल्यामुळे तेथील कामाचा दर्जा पाहिला जात नाही. निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून चांगल्या दर्जाच्या साहित्याची बोगस बिले दाखवून पैसे काढले जात असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात असे प्रकार सुरु असल्याचे एका ठेकेदारानेच सांगितले.सध्या जिल्हा परिषदेतील बांधकाम सभापती, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयात फर्निचर व रंगरंगोटीचे सुमारे चाळीस लाखांचे काम सुरु आहे. या तिन्ही कामांचा ठेका एका मजूर संस्थेला मिळाला आहे. तीन लाखावर कामाची रक्कम असल्यामुळे नियमानुसार आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण केली आहे. या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदारास हे काम मिळाल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये रंगली आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे काम करीत असताना आर्किटेक्ट नेमण्याची गरज होती. परंतु, तसे काहीच केले नसल्याचे बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले. या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्यावरही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठेकेदार करीत असलेल्या कामावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण का नाही, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.आॅनलाईन ठेकेही मॅनेज? अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदार असल्यामुळे कोणते काम कोणाला मिळाले पाहिजे, याची व्यवस्था ते करतात. जिल्हा परिषदेतील पैसे मिळविण्याचा ठेका ठराविक मजूर संस्था अथवा सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यास मिळावा, यासाठी ठरवूनच निविदा भरल्या जात आहेत. यामध्ये अन्य कोणी निविदा भरू नये, अशी सूचना काही शाखा अभियंतेच ठेकेदारांना करत आहेत. अधिकाऱ्यांच्या या कारभारावर जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.