रस्त्याचा वाद जीवावर उठला; जतमध्ये तरुणाची डोक्यात गज मारुन हत्या, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:58 IST2025-06-03T10:52:38+5:302025-06-03T11:58:52+5:30

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.

Youth killed by hitting head with iron rod over street dispute Incident in Sangli | रस्त्याचा वाद जीवावर उठला; जतमध्ये तरुणाची डोक्यात गज मारुन हत्या, आरोपीला अटक

मृत हिरोल मल्लाळकर

विठ्ठल ऐनापुरे 

जत : जत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अचकनहळळी या गावात राहणाऱ्या हिरोल उर्फ बाबु मल्लाळकर (वय २६) आणि मंजुनाथ काळे (वय २५) यांच्यात रस्त्यावरुन सोमवारी कडाक्याचे भांडण झाले. यावेळी संशयित आरोपी मंजुनाथ काळे याने लोखंडी गजाने हिरोल उर्फ बाबु मल्लाळकर याच्या डोक्यात वार केल्याने तो जागीच ठार झाला. सोमवारी रात्री साडे नऊ वाजता ही घटना घडली. 

अचकनहळ्ळी येथील हिरोल व मंजुनाथ यांच्यात काही दिवसापासून रस्त्यावरुन वाद होता. सोमवारी रात्री देखील त्यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी मंजुनाथ याने लोखंडी गजाने हिरोलच्या डोक्यात वार केला. वार वर्मी बसल्यामुळे हिरोल जागीच ठार झाला. या घटनेची माहिती तात्काळ ग्रामस्थांनी जत पोलिस ठाणेस कळवली. जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदे हउत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालय येथे आणला. संशयित आरोपी मंजुनाथ काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने खुनाची कबुली दिली आहे.
 

Web Title: Youth killed by hitting head with iron rod over street dispute Incident in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.