शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गरम्य सागरेश्वरमध्ये रंगलं ‘आपलं साहित्य संमेलन’

By admin | Updated: September 11, 2014 00:12 IST

कविसंमेलनाला दाद

देवराष्ट्रे : वार रविवार... सागरेश्वर अभयारण्यातील निसर्गरम्य ठिकाण... आभाळातून पळणारे ढग अन् मध्येच डोकावणारा सूर्यनारायण, पक्ष्यांचा किलबिलाट अन् मधूनच येणारा मोरांचा केंकारणारा आवाज... अशा विलोभनीय वातावरणात ‘आपलं साहित्य संमेलन’ दिलखुलास रंगलं. दिवसभरात पावसाची सर आलीच नाही. मात्र विविध विषयाला स्पर्श करणाऱ्या काव्यधारांनी उपस्थित श्रोते न्हाऊन निघाले.निमित्त होतं सागरेश्वर अभयारण्याचे जनक, साहित्यिक, वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या स्मृतिदिनाचं. कडेगाव-खानापूर तालुका साहित्य परिषद व वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रतिवर्षी स्मृतिदिनानिमित्त ‘आपलं साहित्य संमेलन’ आयोजित केले जाते. यंदाचे संमेलनाचे पाचवे वर्ष. या संमेलनात ना सभामंडप ना ध्वनिक्षेपकाची सोय, ना निमंत्रण पत्रिका ना जेवणाची सोय. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक साहित्यिक घरातूनच जेवणाची शिदोरी बरोबर घेऊन येतो, हे या संमेलनाचं आगळंवेगळं वैशिष्ट्य. साहित्यिक रघुराज मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन पार पडले. यावेळी समाधान पोरे यांना वृक्षमित्र धों. म. मोहिते ‘पर्यावरण पत्रकार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मेटकरी यांच्याहस्ते व अ‍ॅड. सुभाष पाटील, प्रा. विश्वनाथ गायकवाड, बी. टी. महिंद, रानकवी सु. धों. मोहिते यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले. मेटकरी म्हणाले, ग्रामीण साहित्य समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. नवोदित लेखकांना पाठबळ मिळणे आवश्यक आहे. संमेलनात राजा रावळ, रवी राजमाने, स्वाती पवार, प्रा. विजय जंगम, भानुदास आंबी, एकनाथ गायकवाड, अरविंद पत्की, अनुराधा पत्की, किरण भिंगारदेवे, किरण शिंदे, जयवंत आवटी, बाळ बाबर, प्रदीप सुतार, बाळासाहेब मोहिते, अनिल पवार सहभागी झाले होते. (वार्ताहर)कविसंमेलनाला दादवनभोजनानंतर दुसऱ्या सत्रात कविसंमेलन चांगलेच रंगले. हौसाताई जाधव यांनी सागरेश्वर अभयारण्य उभारणीतील कामाचे चित्र गीतातून उभे केले. राहुल वीर यांनी ‘आयुष्याचा नवा रंग’ काव्यातून सादर केला. अंधकवी चंद्रकांत देशमुख यांनी शेजारील राष्ट्राच्या कारवायांवर प्रकाशझोत टाकला, तर सौ. संजीवनी कुलकर्णी यांनी ‘सावधान माणसा’ असा कवितेतून इशारा दिला. एम. बी. जमादार यांनी गझल सादर केली.