Sangli- जवान मयूर डोंबाळे अनंतात विलीन, स्वत:वर गोळी झाडून घेत संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 06:27 PM2023-07-10T18:27:31+5:302023-07-10T18:28:28+5:30

पार्थिव दारात येताच आई-वडिलांसह कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला

Young Mayur Dombale merges into infinity, ends his life by shooting himself | Sangli- जवान मयूर डोंबाळे अनंतात विलीन, स्वत:वर गोळी झाडून घेत संपवले जीवन

Sangli- जवान मयूर डोंबाळे अनंतात विलीन, स्वत:वर गोळी झाडून घेत संपवले जीवन

googlenewsNext

तासगाव : यमगरवाडी (ता. तासगाव) येथील मयूर लक्ष्मण डोंबाळे (वय २३) या सैन्यदलातील जवानाने शुक्रवारी आत्महत्या केली होती. रविवारी यमगरवाडी येथे पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. यावेळी आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार रवींद्र रांजणे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

रविवारी (दि. ९) सकाळी मयूर डोंबाळे याचे पार्थिव गावी आणण्यात आले. पार्थिव दारात येताच आई-वडिलांसह कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरमधून पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आले.

आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार रवींद्र रांजणे, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव ताजुद्दीन तांबोळी, सरपंच अशोक यमगर, उपसरपंच नारायण यमगर, तासगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. बी. माळी, ग्रामसेवक दीपक जाधव, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सुभेदार मेजर आनंदराव पाटील, १४ मराठाचे नायब सुभेदार बाबासाहेब वावरे, अर्जुन यमगर, पोलिस पाटील संजय यमगर यांच्यासह विविध स्तरांतील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

स्वत:वर गोळी झाडून घेत संपवले जीवन, जम्मू-कश्मीरमध्ये बजावत होता सेवा

जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात कर्तव्यावर असताना स्वत:वर गोळी झाडून घेऊन जवान मयूर याने आत्महत्या केली. . दोन वर्षांपूर्वीच तो भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Young Mayur Dombale merges into infinity, ends his life by shooting himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली