Sangli: रील्स पाहून ओळख वाढवली, योगा शिक्षिकेवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:46 IST2025-05-08T13:44:42+5:302025-05-08T13:46:47+5:30

सांगली : योगा प्रशिक्षक महिलेच्या इन्स्टाग्रामवरील रील्स पाहून नंतर तिच्याशी ओळख वाढवून लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला ...

yoga teacher raped with the lure of marriage in sangli | Sangli: रील्स पाहून ओळख वाढवली, योगा शिक्षिकेवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार

Sangli: रील्स पाहून ओळख वाढवली, योगा शिक्षिकेवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार

सांगली : योगा प्रशिक्षक महिलेच्या इन्स्टाग्रामवरील रील्स पाहून नंतर तिच्याशी ओळख वाढवून लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत माधवनगर (ता. मिरज, जि. सांगली) येथील चप्पल व्यापारी मुकेश मनोहर नरसिंगानी (वय ३९) याच्याविरुद्ध पीडितेने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुकेशला अटक करण्यात आली आहे.

मुंबई परिसरातील ३९ वर्षीय घटस्फोटीत महिला योग प्रशिक्षक आहे. तिचे इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. योगाच्या रील्स पाहून सप्टेंबर २०२३ मध्ये मुकेश तिच्याकडे आकर्षित झाला. त्यानंतर त्यांच्यात मेसेजची देवाणघेवाण सुरू झाली. दोघांची चांगली ओळख झाल्यानंतर ते एकमेकांना भेटायला लागले. मुकेश हा विवाहित असतानाही त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर सांगलीतील लॉजवर आणि मीरारोड-भाईंदर परिसरातील लॉजवर त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

मुकेशने लग्न न करता फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पीडिताने मंगळवारी संजयनगर पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर मुकेश याला तातडीने अटक केली.

Web Title: yoga teacher raped with the lure of marriage in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.