शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

येरळा, अग्रणी, बोर, माण नद्यांचे पात्र कोरडे; सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यातील गंभीर चित्र

By शीतल पाटील | Updated: August 9, 2023 18:39 IST

प्रशासनाची अनास्था व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे नदी पुनर्जीवनाचा कार्यक्रमाची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही

सांगली : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कृष्णा, वारणा या दोन नद्या दुथडी भरून वाहत असताना येरळा, अग्रणी, बोर या दुष्काळी पट्ट्यातील नद्याचे पात्र मात्र कोरडेच असल्याचे गंभीर चित्र आहे. प्रशासनाची अनास्था व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे नदी पुनर्जीवनाचा कार्यक्रमाची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही. यंदा येरळा, अग्रणी, माण, बोर नदीकाठच्या जनतेला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागण्याची शकत्या आहे. त्यातील येरळा व अग्रणी नदीला टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेचा काही प्रमाणात आधार आहे.जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, पलूस व मिरज तालुक्यातील काही भागाला पावसाळ्यात दरवर्षी पुराची भीती सतावत असते. याच काळात येरळा, अग्रणी, माण, बोर या नदींचे पात्र मात्र कोरडेच असते. या नद्या बारमाही कधी होणार याचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यापैकी येरळा नदीला ताकारी- टेंभुमुळे, तर अग्रणी नदीला म्हैसाळच्या पाण्यामुळे आधार मिळाला आहे.

येरळा नदीयेरळा नदी कृष्णा नदीची सर्वांत लांब उपनदी आहे. नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या उत्तरेकडील सोलकनाथ टेकडीवर झालेला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव, पलूस, तासगाव या तालुक्यांतून ८५ किलोमीटरचा प्रवास करीत येरळा नदी ब्रह्मनाळजवळ कृष्णा नदीत मिसळते. या नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. नदीमध्ये टेंभू ताकारीचे पाणी सोडले जाते. सध्या नदीत बांधलेल्या बंधाऱ्यांत थोडेफार पाणी दिसून येते. तूरची, ढवळी परिसरात मात्र नदीचे पात्र कोरडेच आहे. वसगडे बंधाऱ्यात थोडेफार पावसाचे पाणी आहे.

अग्रणी नदीखानापूर तालुक्यातील तामखडी येथे उगम पावणाऱ्या अग्रणी नदीचे खोरे खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात विस्तारले आहे. ही नदी तशी कोरडीच म्हणावी लागेल. टेंभूच्या पाण्यामुळे बेनापुर, सुलतानगादे, करंजे बंधाऱ्यापर्यंत पाणी असते. त्यानंतर गव्हाणपर्यंत नदीचे पात्र कोरडे आहे. गव्हाणमध्ये म्हैशाळ योजनेचा पाचवा टप्पा असून, लिंगनूर बाजूने सिंचन योजनेचे पाणी येते. त्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात नदीचे पात्र पावसाळ्यातही कोरडे ठणठणीत आहे.

बोर नदीजत तालुक्यातील दुष्काळाची मूक साक्षीदार असलेली बोर नदी पावसाळ्यातही कोरडीच आहे. यंदा जत तालुक्यात पाऊसमानही कमी झाले आहे. नदीचे पात्र ठणठणीत आहे. परतीच्या पावसात या नदीला थोडेफार पाणी असते. तेही आठ - दहा दिवसांतच निघून जाते. यंदाही परतीच्या पावसाकडे बोर नदी खोऱ्यातील लोकांचे लक्ष लागले आहे.

माण नदीजिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी तालुक्यातून वाहणारी माण नदी नेहमीच कोरडी असते. ‘बारमाही कोरडी नदी’ म्हणून तिचा उल्लेख होतो. यंदाच्या पावसाळ्यातही नदीला पाणी नाही. नदीजोड प्रकल्पातूनच माण नदी प्रवाहित होऊ शकते.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणी