शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

यल्लमा चौक, गांधी चौक ओस

By admin | Updated: October 7, 2014 23:40 IST

इस्लामपुरातील चित्र : यंदा प्रचारसभाच नाहीत

अशोक पाटील-- इस्लामपूर -माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात ‘एकास एक’ उमेदवार देण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे प्रचाराची हवा गरम होण्याऐवजी थंड झाली आहे. प्रत्येक निवडणुकीत इस्लामपूर शहरातील यल्लमा चौक, गांधी चौकातील प्रचार सभा गाजतात. यावेळी मात्र हे चौक अद्यापही शांतच आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याविरोधात बोरगावचे माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांचे चिन्ह मतदारांच्या परिचयाचे आहे. परंतु इतर अपक्षांची चिन्हे अद्यापही मतदारांपर्यंत पोहोचलेली नाहीत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसविरोधात राजू शेट्टी यांचे निवडणूक चिन्ह असलेली ‘शिट्टी’ चांगलीच गाजली होती. याचा फायदा विधानसभा निवडणुकीत उठविण्यासाठी स्वाभिमानीचे बंडखोर उमेदवार बी. जी. पाटील यांनी शिट्टी हेच चिन्ह घेऊन प्रचाराला गती आणली आहे. जयंत पाटील यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्यासाठी राजू शेट्टी आग्रही होते. परंतु त्यांना यश आले नाही. स्वाभिमानीचे बंडखोर बी. जी. पाटील यांनी त्यांच्या प्रचार पत्रिकेवर शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांचे छायाचित्र वापरल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसच्या अभिजित पाटील यांनी शेट्टी यांना साथ दिली. हा पैरा फेडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना थेट उमेदवारी दिली नसली तरी पाठिंबा दिला आहे. याव्यतिरिक्त रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे विलास रकटे, बसपचे महावीर कांबळे, मनसेचे उदयसिंह पाटील हेही रिंगणात आहेत. मात्र जयंत पाटील यांच्याविरोधात ‘एकास एक’ उमेदवार देण्याचा प्रयत्न फसल्याने सर्व काही शांत असून, शहरात होणाऱ्या विराट सभांनाही खो बसला आहे.निवडणूक कोणतीही असो, शहरातील यल्लमा चौक, गांधी चौकातील प्रचार सभा गाजतातच. यावेळी मात्र हे चौक अद्याप शांत आहेत. चिन्हे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कसरतकाँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या राजकीय पक्षांची चिन्हे मतदारांच्या परिचयाची आहेत. परंतु इतर अपक्षांची चिन्हे अद्यापही मतदारांपर्यंत पोहोचलेली नाहीत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधात राजू शेट्टी यांचे निवडणूक चिन्ह असलेली ‘शिट्टी’ चांगलीच गाजली होती. याचा फायदा विधानसभा निवडणुकीत उठविण्यासाठी स्वाभिमानीचे बंडखोर उमेदवार बी. जी. पाटील यांनी शिट्टी हेच चिन्ह घेऊन प्रचाराला गती आणली आहे.