शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांची आराधना आणि पर्यावरणाच्या संवर्धनाचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST

संतोष भिसे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गणेशोत्सवात बाप्पाच्या आराधनेसोबतच पर्यावरणाच्या जपणुकीचे महत्त्वही जाणणाऱ्या भाविकांसाठी बेकिंग सोड्याचा पर्याय पुढे ...

संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गणेशोत्सवात बाप्पाच्या आराधनेसोबतच पर्यावरणाच्या जपणुकीचे महत्त्वही जाणणाऱ्या भाविकांसाठी बेकिंग सोड्याचा पर्याय पुढे आला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बेकिंग सोड्याच्या पाण्यात विरघळत असल्याने प्रदूषणाच्या समस्येचेही विसर्जन होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी दाखवून दिले आहे.

पीव्हीपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने अध्यात्मिकदृष्ट्या मूर्तीच्या पावित्र्याचा प्रश्न निर्माण होतो, शिवाय पाण्याचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. पर्यावरणप्रेमी भाविक शाडूच्या मूर्तींना पसंती देत असले तरी मागणीइतक्या त्या उपलब्ध होत नाहीत. नाईलाजाने पीव्हीपीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी लागते. यावर सुवर्णमध्य शोधताना पर्यावरणप्रेमींनी बेकिंग सोड्याचा उपाय शोधला आहे. बेकरी उत्पादनांमध्ये वापरले जाणारे सोडियम बायकार्बोनेट किंवा उद्योगांत वापरले जाणारे अमोनियम बायकार्बोनेट हा सोडा मूर्ती विरघळविण्यासाठी कामी येतो. बाजारात ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने तो मिळतो.

बॉक्स

४८ तासांत विरघळेल मूर्ती

सुमारे एक ते दीड किलो वजनाची पीव्हीपीची मूर्ती सोड्याच्या पाण्यात ४८ तासांत विरघळते. बादलीभर पाण्यात मूर्तीचे यथासांग विसर्जन केल्यानंतर त्यात सोडा टाकावा. दोन-तीन तासांच्या अंतराने ढवळत राहावे. दोन दिवसांत मूर्ती पूर्णत: विरघळून जाते.

बॉक्स

खत आणि चुना म्हणून वापर

- सोड्याच्या पाण्यात मूर्ती पूर्ण विरघळल्यानंतर तळाला पीव्हीपीची पेस्ट शिल्लक राहते. तिचा वापर चुना, खडू याच्या स्वरुपात करता येतो.

- बादलीत वर राहिलेले पाणी बागेसाठी उत्तम खत म्हणून उपयुक्त ठरते. बाप्पांच्या मूर्तीच्या अंशातून बागेत फुले फुलवणे आनंददायी ठरते.

बॉक्स

सोडा आणि पाण्याचे प्रमाण

मूर्तीचे वजन पाण्याचे प्रमाण बेकिंग सोडा किलोमध्ये

१ किलो १० लीटर १ किलो

२ किलो १५ लीटर २ किलो

५ किलो ३० लीटर ४ किलो

ग्राफ

पीओपी मूर्तींचाच जास्त वापर

वर्ष पीओपी शाडू

२०१९ ३०००० ५०००

२०२० २५००० ४०००

२०२१ ४०००० ८०००