शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराने फसविल्याने मजूर बनले भिकारी

By admin | Updated: December 19, 2014 00:14 IST

वासीममधील कुटुंबे : चिमुकल्यांसह स्टेशनचा आसरा

बालेचाँद हेरवाडे - पट्टणकोडोली -शेकडो मैल दूर पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या सुकाळी (जि. वासिम) येथील सात जोडप्यांना ठेकेदाराने फसविल्याने त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. गावाकडे परतीसाठी पैसेही नाहीत. त्यामुळे मिळणाऱ्या भीकेतून पोट भरत कोल्हापूर रेल्वेस्टेशनमध्ये ते आपल्या लहान मुलांसोबत निवारा करून दिवस घालवित आहेत.ठेकेदार विठ्ठल शिंदे त्यांच्याच गावानजीकचा. त्याच्याकडे ही जोडपी खुदाई व पाईपलाईन तसेच मिळेल ते काम काही वर्षांपासून करीत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी ते ठेकेदाराबरोबर कोल्हापुरात आल्यावर ठेकेदार रेल्वे स्टेशनजवळ सोडून पसार झाला. या सर्वांनी शिंदे यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क न झाल्याने त्यांना आपण फसल्याची जाणीव झाली. मुळातच ठेकेदाराबरोबर आलेल्या मजुरांकडे पैसेही नाहीत. एक दिवस रेल्वे स्टेशनवरच उपाशी घालविला. दुसऱ्या दिवशी सोबत असणारी लहान मुले भुकेने व्याकूळ झाल्याने तसेच जवळ खाण्यासाठी पैसेही नसल्याने या मजुरांनी कामाची शोधाशोधही केली. काम मिळाले नसल्याने मात्र, त्यांना नाईलाजाने भीक मागण्याचा मार्ग अवलंबावा लागला. त्यामुळे या सर्व मजुरांना काम मिळण्याबरोबरच गावी परतीसाठी मदतीचा हात हवा आहे. कष्टच करून पोटाची खळगी भरली पाहिजे. मात्र, आम्हाला फसवून कामाच्या बहाण्याने आणून ठेकेदार अनोळखी ठिकाणी सोडून पसार झाला. त्यामुळे काम शोधूनही मिळत नसल्याने शेवटी नाईलाजास्तव भीक मागावी लागत आहे.- सुभाष म्हादू नवघरे