शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

संजयनगर येथे कुत्रा-कुत्रीच्या लग्नाचा अद्भुत सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 15:44 IST

Dog marriage Sangli -सांगली शहरातील संजयनगर मधील विलास गगणे यांच्या कुटुंबांनी आपल्या कुत्रा-कुत्रीचं लग्न धुमधडाक्यात लावून दिलं. कोरोनामुळे सरकारने घातलेल्या नियमानुसार हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला परिसरातील नागरिक आणि गावकरीही उत्साहानं सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसंजयनगर येथे कुत्रा-कुत्रीच्या लग्नाचा अद्भुत सोहळापरिसरातील नागरिक उत्साहानं सहभागी

सुरेंद्र दुपटेसंजयनगर/सांगली : सांगली शहरातील संजयनगर मधील विलास गगणे यांच्या कुटुंबांनी आपल्या कुत्रा-कुत्रीचं लग्न धुमधडाक्यात लावून दिलं. कोरोनामुळे सरकारने घातलेल्या नियमानुसार हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला परिसरातील नागरिक आणि गावकरीही उत्साहानं सहभागी झाले होते.सांगलीतील संजयनगर परिसरातील गगणे कुटुंबांनी घरातील कुत्रा-कुत्रीचं लग्न धुमधडाक्यात लावून द्यायचे ठरवलं. त्याप्रमाणे हा लग्नसोहळाही पन्नास नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलं. शिवाय या पाहुणे मंडळीच्या भोजनाचीही व्यवस्था यावेळी करण्यात आली होती.आपल्या घरातल्या, मित्रांच्या किंवा माणसांच्या लग्नात जे-जे होतं, ते सगळं या कुत्रा-कुत्रीच्या लग्नात करण्यात आलं. अगदी, 'आमच्या टायगरच्या लग्नाला यायचं हं...' अशा आशयाच्या पत्रिकेपासून ते साश्रु नयनांनी नवरीला निरोप देण्यापर्यंत सगळं या लग्नसोहळ्यात होतं. त्यात मानपान, आहेर, रुखवत हेही आलं बरं!या अद्भुत विवाहसोहळ्यात वर होता टायगर आणि वधू होती डाँली. त्यांच्या कुटुंबांनी गुरुवारीच या दोघांचा साखरपुडाही थाटात केला होता. त्यानंतर प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी तर गावात आनंदाला उधाणच आलं होतं.फुलांनी सजवलेल्या कारमधून डॉलीला टायगरच्या घरी नेण्यात आलं. या वरातीत गावकरी संगीताच्या तालावर नाचत होते. मंडपात जेवणाची जोरदार तयारी सुरू होती. वधूच्या कुटुंबीयांनी वरपक्षाचं दणक्यात स्वागत केलं. डॉलीला लाल रंगाची साडी नेसवण्यात आली होती. टायगरही रुबाबदार दिसत होता.मोजके विधी केल्यानंतर या दोघांनी एकमेकांना हार घातले आणि विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. तोपर्यंत वधू निद्राधीन झाली होती. तिच्या विदाईची वेळ होताच, वधुपक्षाला अश्रू अनावर झाले. त्यांनी डाँलीला प्रेमानं उठवून टायगरच्या गाडीत बसवलं. तिला खाण्या-पिण्याच्या वस्तू आणि आहेरही दिला. त्यानंतर बँडबाजाच्या तालावर टायगर डाँलीची वरात निघाली.या अनोख्या लग्नाची चर्चा आसपासच्या गावांमध्येही सुरू आहे. यावेळी विशाल कांबळे, विलास गगणे, आक्काताई गगणे, दिपाजंली गगणे, महेश भोरकडे आदी या सोहळ्यास उपस्थित होते. 

टॅग्स :dogकुत्राmarriageलग्नSangliसांगली