महिलांनी राजकारणातही पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:28+5:302021-02-05T07:27:28+5:30

शिराळा : ग्रामीण भागातील महिलांनी समाजकारण, व्यवसाय, उद्योग, अर्थकारण याबरोबरच राजकारणातही पुढे यायला हवे, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक, ...

Women should also come forward in politics | महिलांनी राजकारणातही पुढे यावे

महिलांनी राजकारणातही पुढे यावे

शिराळा

: ग्रामीण भागातील महिलांनी समाजकारण, व्यवसाय, उद्योग, अर्थकारण याबरोबरच राजकारणातही पुढे यायला हवे, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स सेवा केंद्रात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा शाखेमार्फत घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते.

मानसिंगराव नाईक म्हणाले, शिराळा महोत्सव, बचत गट, मंगळागौरी, खेळ पैठणीचा आदीं कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. महिलांनी चूल आणि मूल यावरच न थांबता समाजात पुढे यायला हवे. काही महिलांना दूध संघामार्फत दूध संकलन केंद्रे सुरू करून दिली आहेत. ज्या महिला एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून छोटे-मोठे व्यवसाय करत आहेत. त्यांच्या मालाला आपला बझारच्या माध्यमातून हक्काचे विक्री केंद्र दिली आहेत.

आपला बझारच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक, सखी मंचाच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील, बँक कर्मचारी रेश्मा खांडेकर यांची भाषणे झाली. यावेळी वीरमाता शशिकला माने (पुनवत), कोविड योद्धा म्हणून डॉ. जुबेर मोमीन व डॉ. अनिरुद्ध काकडे (शिराळा) यांचा सत्कार आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. भगवान उरूनकर यांनी आभार मानले.

फोटो-२७शिराळा१

फोटो ओळी : भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील आयोजित महिला मेळाव्यात आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केेले.

Web Title: Women should also come forward in politics