तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव; दावेदार कोण? सर्वच पक्षांत उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:06 IST2025-10-07T19:05:41+5:302025-10-07T19:06:08+5:30

निवडणूक अधिकच चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता

Women from open category reserved for the post of Mayor of Tasgaon Municipality Curious about who the contender is | तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव; दावेदार कोण? सर्वच पक्षांत उत्सुकता

तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव; दावेदार कोण? सर्वच पक्षांत उत्सुकता

तासगाव : मुंबई येथे सोमवारी पार पडलेल्या नगरपालिकांच्या आरक्षण सोडतीत तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गातील महिला राखीव असे आरक्षण घोषित झाले. या आरक्षण सोडतीमुळे खुल्या प्रवर्गातील दिग्गज नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे तर नगराध्यक्षपदाच्या दावेदार कोण असणार, याची सर्वच पक्षांत उत्सुकता निर्माण झाली आहे.

नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला राखीव घोषित झाल्यामुळे तासगाव शहरातील अनेक दिग्गज नेत्यांचा भ्रमनिरास झाला. आगामी निवडणुकीच्या रिंगणात आता कोणत्या महिला नेत्यांना संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तासगावमध्ये गेल्या काही काळापासून विविध राजकीय पक्षांनी नगराध्यक्षपदावर आपला दावा मजबूत करण्याची तयारी केली होती. मात्र, आरक्षण महिला प्रवर्गात गेल्याने आता पक्षांना नवे गणित मांडावे लागणार आहे. 

स्थानिक पातळीवरील महिला नेतृत्वाला त्यामुळे नवा ऊर्जासंचार मिळाल्याचे दिसत आहे. नगराध्यक्षपद महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तासगावमधील निवडणूक अधिकच चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता आहे. आता शहरात चर्चेला उधाण आले असून, कोण होणार तासगावच्या नगरपालिकेची पुढची नगराध्यक्षा? हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

Web Title: Women from open category reserved for the post of Mayor of Tasgaon Municipality Curious about who the contender is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.