Sangli crime: अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 19:25 IST2023-06-05T19:24:44+5:302023-06-05T19:25:10+5:30
पीडितेच्या पती व मुलांना मारून टाकण्याची धमकी

Sangli crime: अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका गावातील ३१ वर्षीय महिलेस दोघांमधील असलेले अनैतिक संबंध इतरांना सांगण्याची धमकी देत तिच्यावर इच्छेविरुद्ध बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार फेब्रुवारी ते ३ जून अशा चार महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी घडला आहे.
याबाबत पीडित महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश सूर्यवंशी (पूर्ण नाव व पूर्ण पत्ता नाही) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संशयित अविनाश सूर्यवंशी याने पीडितेच्या मोबाईलवर फोन करून दोघांमधील संबंध उघड करण्याची धमकी देत तिला कामेरी येथील बसथांब्यावर बोलावून घेतले. तेथून दुचाकीवरून शिवपुरी गावातील लॉजवर घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास पीडितेच्या पती व मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली. सहायक पोलिस निरीक्षक सागर वरूटे अधिक तपास करीत आहेत.