शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

गुंडगिरी करणाऱ्यांना निवडून देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2015 23:30 IST

पतंगराव कदम : कवठेमहांकाळ येथील प्रचार सभेत सवाल; भाजप नेत्यांवर टीका

कवठेमहांकाळ : तासगावमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत गुन्हेगारांनी कहर केला आहे. ही लोकशाहीच्या इतिहासातील दुर्दैवी घटना आहे. मग अशा गुंडगिरी प्रवृत्तीला आपण पोसायचे का? त्यांना आपण संधी द्यायची का?, असा सवाल आ. पतंगराव कदम यांनी खासदार संजयकाका पाटील यांचे नाव न घेता केला. दरम्यान, अशा प्रवृत्तींना जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार करावे, असे आवाहनही त्यांनी केले.कवठेमहांकाळ येथे मंगळवारी शेतकरी दूध संघाच्या सभागृहात वसंतदादा रयत पॅनेलच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व मतदारांची सभा पार पडली. यावेळी कदम बोलत होते.कदम म्हणाले की, माझ्या आजवरच्या राजकीय जीवनात मी संस्था वाढविण्याचे व सुदृढ ठेवण्याचे काम केले. संस्था काढायच्या व मोडायच्या हा उद्योग कधीच केला नाही. त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीत मिरज, कवठेमहांकाळ, जतच्या लोकांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचा वचक होता. परंतु आता महाराष्ट्राच्या राजकारणात ‘सांगली चिल्लर’ झाली आहे. वसंतदादांच्या पश्चात सांगलीचा दबदबा राहिला नाही. हा दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी जनतेने आपल्याला ताकद व आशीर्वाद द्यावेत.सांगलीच्या राजकारणात ‘सत्तापिपासू’ टोळ्या निर्माण झाल्या आहेत. टोळ्या करून सत्ता भोगायची अन् स्वार्थ साधायचा, असे उद्योग या टोळ्यांनी आजवर जिल्ह्यात केले आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी अशा टोळ्या मतदारांनी राजकारणातून हद्दपार कराव्यात. लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकारणाला गुंडगिरीचा वास येऊ लागला आहे. त्यामुळे अशा लोकांना संधी द्यायची का, याबाबतचा निर्णय मतदारांनी घ्यावा, असे ते म्हणाले. अजितराव घोरपडे म्हणाले, शेती व शेतकऱ्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून मतदारांनी काठावर विजयी करू नये, तर भरघोस मतांनी विजयी करावे. बाजार समितीचा निकाल भविष्यातील राजकारणाला कलाटणी देणारा असेल. शेतकऱ्यांसाठी भविष्यात बरेच काही करायचे आहे. त्यामुळे त्यादृष्टीने मतदारांनी कौल द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या सभेत माजी आमदार दिनकर पाटील, आप्पासाहेब शिंदे, शंकर गायकवाड यांचीही भाषणे झाली. सभेस आनंदराव मोहिते, राजवर्धन घोरपडे, बाळासाहेब गुरव, माणिकराव भोसले, उदयसिंह शिंदे, सुनील माळी, तानाजी यमगर उपस्थित होते. (वार्ताहर)उपायुक्तांची नियुक्तीऔषध गोदामामधील घोटाळ्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे उपायुक्त एस. बी. कोळी आणि सांगली जिल्ह्याचे प्रभारी उपायुक्त बी. ए. शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर डॉ. विश्वासराव मोरे आणि अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी होणारपशुसंवर्धन विभागाकडे तीन लाखांची औषधाची मागणी केली होती. प्रत्यक्षात औषधाचा पुरवठा न होताच सर्व तालुक्यांकडून पोच घेऊन संबंधित कंपनीला तीन लाखांचा धनादेश दिला होता. प्रत्यक्षात दोन वर्षात औषधेच मिळाली नाहीत. या घोटाळ्याबद्दल जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी आवाज उठविल्यानंतर मे २०१५ रोजी रोखीने तीन लाख रुपये भरल्याचे चलन फाईलला लावल्याचे आढळून आले आहे. या औषध खरेदीचा सर्व गोंधळ पाहिल्यास हा घोटाळाच असल्याने संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी दोषींवर फौजदारी कारवाईसाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे. येत्या आठ दिवसांत औषध खरेदी घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होईल, असे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.