शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ाीस वाळू तस्करांना मोक्का लावणार

By admin | Updated: December 27, 2016 00:57 IST

चंद्रकांतदादा पाटील : अधिकाऱ्यांच्या शर्टालाही हात लावू देणार नाही

सांगली : अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांकडून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र आता असे हल्ले रोखण्यासाठी महसूल अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांकडून संयुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. वाळू तस्करांची दादागिरी मोडून काढण्यासाठी महिनाभरात जिल्ह्णातील २५ ते ३० वाळू तस्करांना ‘मोक्का’ लावणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार बैठकीत दिली.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने महसूलमंत्री पाटील सांगलीत आले होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाळू तस्करांवरील कारवाईबाबत माहिती दिली. सरकारी अधिकाऱ्यांच्या शर्टालाही हात लावू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पाटील म्हणाले की, जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातही महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अवैध वाळू उपशावर कारवाई करताना तस्करांकडून हल्ले होत आहेत. वाळू तस्करांची ही दादागिरी खपवून घेणार नसून, येत्या महिनाभरात जिल्ह्यातील २५ ते ३० वाळू तस्करांवर ‘मोक्कां’तर्गत कारवाई करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राजकारण्यांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्यांवर कारवाई करत त्यांना चाप लावला आहे. त्याच धर्तीवर दबाव झुगारून वाळू तस्करांवर कारवाई करण्यात येणार आहे. महसूल अधिकाऱ्यांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. यावर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यासाठी सर्व महसूल अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांची ९ जानेवारीला बैठक आयोजित करण्यात येणार असून, यात वाळू तस्करांवरील कारवाईबाबत आराखडा तयार करण्यात येणार आहे.यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजय पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)