धक्कादायक! घरगुती वादातून डोक्यात खोरे घालून पत्नीचा खून

By श्रीनिवास नागे | Updated: September 6, 2022 18:58 IST2022-09-06T11:33:28+5:302022-09-06T18:58:00+5:30

बऱ्याचवेळा किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होत होते.

Wife killed due to domestic dispute, Incidents in Tasgaon Taluka sangli district | धक्कादायक! घरगुती वादातून डोक्यात खोरे घालून पत्नीचा खून

धक्कादायक! घरगुती वादातून डोक्यात खोरे घालून पत्नीचा खून

सांगली : तासगाव तालुक्यातील विसापूर येथे पतीने पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काजल बिरजू जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. घरगुती वादातून पती बिरजू जाधव याने काजल हिच्या डोक्यात खोरे घालून तिचा जीव घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काजलचा खून केल्यानंतर बिरजू पळून गेला आहे. आज, मंगळवारी पहाटे ही घटना घडली.

काजल हिचा विवाह सात वर्षांपूर्वी आळसंद (ता. खानापूर) येथील बिरजू जाधव याच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. सुरुवातीची काही वर्षे दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र काही वर्षानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वादास सुरुवात झाली. बऱ्याचवेळा किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होत होते. संसार व माहेरच्या लोकांनी एकत्रित बसून अनेकवेळा दोघांमधील वाद मिटवले होते. मात्र, पुन्हा दोघांमध्ये वादावादी सुरू व्हायची.

सततच्या वादामुळे सासरच्या लोकांनी काजलला महिनाभरापूर्वी विसापूर येथे माहेरी सोडले होते. वादावादीवेळी दोघांचे विषय घटस्फोटापर्यंतही गेले होते. दरम्यान, काल (सोमवारी) बिरजू हा काजल हिच्याकडे आला होता. पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान दोघांमध्ये पुन्हा वादास सुरुवात झाली. याच वादातून बिरजू याने काजलच्या डोक्यात खोरे घालून तिचा खून केला. खून केल्यानंतर बिरजू पळून गेला. तासगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Wife killed due to domestic dispute, Incidents in Tasgaon Taluka sangli district