Sangli: लग्न का लावून देत नाही?, मुलाने आई-वडिलावर केला कुऱ्हाडीने हल्ला 

By हणमंत पाटील | Updated: October 20, 2023 16:00 IST2023-10-20T15:59:41+5:302023-10-20T16:00:33+5:30

राहुल संकपाळ उमदी: कोंतेवबोबलाद (ता.जत) येथे तुम्ही माझे लग्न का लावून देत नाही? अशी विचारणा करीत मुलाने जन्मदात्या आई ...

Why not get married, Son attacked parents in sangli | Sangli: लग्न का लावून देत नाही?, मुलाने आई-वडिलावर केला कुऱ्हाडीने हल्ला 

Sangli: लग्न का लावून देत नाही?, मुलाने आई-वडिलावर केला कुऱ्हाडीने हल्ला 

राहुल संकपाळ

उमदी: कोंतेवबोबलाद (ता.जत) येथे तुम्ही माझे लग्न का लावून देत नाही? अशी विचारणा करीत मुलाने जन्मदात्या आई वडिलावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. तसेच मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी संशयित आरोपी आमसिद्ध रामू यरनाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद रामू मल्लाप्पा यरनाळ यांनी उमदी पोलिसात दिली आहे. सदरची घटना मंगळवारी (दि.१७) घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आमसिद्धने वडील रामू यरनाळ व आई ललिता यांच्याकडे माझे लग्न तुम्ही लावून द्या असे म्हणत वाद घातला. हा वाद विकोपाला गेला. यानंतर रागात आमसिद्धने वडील रामू यरनाळ यांच्या पायावर कुऱ्हाडीने घाव घातला. यात ते गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर भावास ही धमकी देत लाथा बुक्क्याने मारहाण केली आहे. आई ललिता यास ही मारहाण केली आहे. याघटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.

Web Title: Why not get married, Son attacked parents in sangli