शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

करमजाई तलावातून मोरणा प्रकल्पासाठी आज पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST

शिराळा : शिराळा पाटबंधारे विभागांतर्गत असणाऱ्या मोरणा मध्यम प्रकल्पामध्ये फक्त ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने उद्या दि. ३० ...

शिराळा : शिराळा पाटबंधारे विभागांतर्गत असणाऱ्या मोरणा मध्यम प्रकल्पामध्ये फक्त ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने उद्या दि. ३० एप्रिल रोजी वाकुर्डे बुद्रूक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात येणार आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे शेतकरी, नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार हे पाणी मोरणा मध्यम प्रकल्पात सोडण्यात येणार आहे.

शिराळा शहरासह आसपासच्या सहा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोरणा मध्यम प्रकल्पामध्ये ९ टक्के, करमजाई तलाव ९३ टक्के, अंत्री बुद्रूक तलाव २३ टक्के, शिवणी तलाव १० टक्के, टाकवे तलाव १९ टक्के, रेठरे धरण तलाव १ टक्के, कार्वे तलाव १८ टक्के याप्रमाणे पाणीसाठा शिल्लक आहे. रेठरे धरण तलावातून शेतीसाठी पाणी बंद केले आहे. फक्त पिण्यासाठी पाणी वापरले जात आहे.

आ. नाईक यांनी सूचना केल्याप्रमाणे कार्यकारी अभियंता वारणा कालवे विभाग इस्लामपूर डी. डी. शिंदे, सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे, शाखा अधिकारी सी. बी. यादव, शाखा अभियंता एस. डी. देसाई, एस. के. पाटील यांनी नियोजन करून सुरुवातीला अंत्री तलावात पाणी सोडले होते. आता मोरणा प्रकल्पात शुक्रवारी पाणी सोडण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने वाकुर्डे योजनेचे पंप बंद होत आहेत. पाणी सोडण्यास विलंब होत आहे.

चौकट

पाण्याचा काटकसरीने वापर करा : देसाई

जर शेतकऱ्यांनी पाणी वापर आणि उपसाबंदीचे काटेकोरपणे पालन केले तर उद्या संध्याकाळपर्यंत पाणी मोरणा प्रकल्पात पोहोचेल. एप्रिल महिन्यातच पाण्याची बिकट परिस्थिती आहे. दि. १ मार्चपासून रेठरे धरण तलावातील पाणी शेती वापरासाठी बंद केले आहे. याचबरोबर अंत्री तलावातील पाणी वापरही काटकसरीने करावा, असे आवाहन मोरणा प्रकल्पाचे शाखा अभियंता एस.डी. देसाई यांनी केले आहे.