शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

सांगलीत ऐन दिवाळीत पाणीबाणी; फटाके बाजूला टाकले, बादल्या घेवून आंदोलनाला आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:10 IST

अभ्यंगस्नानादिवशीच नळ पडले कोरडे, बादली, घागर घेऊन ठिय्या

सांगली : गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून ऐन दिवाळीदिवशीच नळ कोरडे पडले होते. गावभाग, शामरावनगर, गणेशनगर, खणभागसह निम्म्याहून अधिक शहराला सोमवारी पाणीपुरवठाच झाला नाही. त्यामुळे संतप्त नागरिक व माजी नगरसेवकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्याला घेराव घातला. पाणीपुरवठा कार्यालयासमोर बादली, घागर घेऊन ठिय्या मारत जाबही विचारला. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळेच सणाच्या काळात पाणीबाणी निर्माण झाल्याचा आरोपही नागरिकांनी केला.सांगली शहरात पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडली आहे. गेल्या महिनाभरापासून शहरातील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारीही केल्या; पण त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. आता अभ्यंगस्नानाच्या दिवशीच शहरातील नळ कोरडे पडले होते. गावभागात सकाळी पाणी न आल्याने नागरिक रस्त्यावर उतरले होते. माजी नगरसेवक युवराज बावडेकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता चिदानंद कुरणे व मनराज साळुंखे यांना वॉर्डातच घेराव घातला. यावेळी महिलांनी महापालिका अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. एक दिवस पाणी बिल भरले नाही तर कनेक्शन तोडले जाते. आता सणासुदीत पाणी मिळत नाही. मग आम्ही बिले कशासाठी भरायची? असा सवालही केला.तर खणभाग, गणेशनगरसह प्रभाग १५ व १६ मधील नागरिकांनी थेट हिराबाग वाॅटर वर्क्सचे कार्यालय गाठले. माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, मयूर पाटील, उत्तम साखळकर, तौफिक शिकलगार, सुजित राऊत यांच्यासह नागरिकांनी बादली, घागर घेऊन पाणीपुरवठा कार्यालयासमोर ठिय्या मारला. यावेळी अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. यावेळी महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

व्हाॅल्व्ह नादुरुस्तहिराबाग येथील जुन्या टाकीच्या ७०० मिमी आऊटलेट मेन लाईनवरील व्हॉल्व्ह अचानक नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे खणभाग, गावभाग, वखारभाग, गणेशनगर, सिद्धार्थ परिसरात पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने झाला. व्हाॅल्व्हच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा होईल. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.

टँकरने पाणीपुरवठादुथडी भरून वाहणारी कृष्णा नदी, पाऊसमानही चांगले, तरीही शहराला अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याविरोधात नागरिकांतून संताप व्यक्त होताच महापालिकेने पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली. दिवसभरात गावभाग, गणेशनगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Faces Water Crisis During Diwali; Residents Protest with Buckets

Web Summary : Sangli residents faced a severe water shortage during Diwali, prompting protests. Frustrated citizens, lacking water supply for days, demonstrated with buckets at the municipal office, demanding immediate action and criticizing the municipality's poor planning amidst the festive season. Tankers were deployed to provide temporary relief.