शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून मतदार यादी पुनरिक्षण होणार

By admin | Updated: December 1, 2014 00:12 IST

कुुशवाह यांची माहिती : मतदान अधिकारी उपस्थित राहणार

सांगली : जिल्ह्यात १ जानेवारी २०१५ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदारयादी विशेष पुनरिक्षण मोहीम १ ते १६ डिसेंबर या कालावधित होणार असून या मुदतीत मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे सर्व अर्ज उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी येथे दिली.
१ डिसेंबर २०१४ रोजी प्रसिध्द होणाऱ्या मतदार यादीतील मतदारांची आकडेवारी विधानसभा मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे आहेत. मिरज- मतदान केंदे्र २८६, मतदार - ३ लाख १ हजार ४३९, सांगली - मतदान केंदे्र २८१, मतदार - ३ लाख २८ हजार ३७१, इस्लामपूर - मतदान केंद्रे २७७, मतदार - २ लाख ४९ हजार ४५७, शिराळा - मतदान केंद्रे ३२६, मतदार - २ लाख ७४ हजार ८९०, पलूस- कडेगाव - मतदान केंदे्र- २६९, मतदार - २ लाख ५३ हजार ६४०, खानापूर - मतदान केंदे्र -३३६, मतदार - २ लाख ९६ हजार ३, तासगाव-कवठेमहांकाळ - मतदान केंद्रे-२८५, मतदार - २ लाख ६६ हजार १७४ , जत - मतदान केंदे्र -२६८, मतदार - २ लाख ४६ हजार ६४२.
१ जानेवारी २०१५ रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांनी नवीन नोंदणीसाठी नमुना ६ मध्ये अर्ज करावा. तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची मतदार यादीची पाहणी करुन खात्री करावी. मतदार यादीत नाव नसल्यास त्याची नोंदणी करावी, तसेच काही चुका असल्यास त्याबाबत दुरुस्तीसाठी नमुना ८ चा फॉर्म भरुन द्यावा.
या पुनरिक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी तपासणी अंतिम निश्चित केलेल्या मृत, स्थलांतरित व दुबार मतदार वगळायचे आहेत. ही वगळणी करण्यात येणाऱ्या संभाव्य मतदारांची यादी सहायक मतदार नोंदणी अधिकारी व पंचायत समिती यांच्या कार्यालयात प्रसिध्द करण्यात येणार आहे. या यादीची पाहणी करुन हरकत घेण्याची असल्यास सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीेने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)


सुट्टीदिवशीही मोहीम
या कार्यक्रमामध्ये ७ व १४ डिसेंबर या दोन दिवशी रविवारची सुट्टी येत आहे. यादिवशीही विशेष मोहीम सुरूच राहणार असून त्याचा सर्व मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे.