विशाल पाटील यांचा प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:22+5:302021-02-05T07:27:22+5:30

शिराळा : येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रजासत्ताक दिनी सांगली येथे ...

Vishal Patil's absence in the Republic Day program | विशाल पाटील यांचा प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात गाैरव

विशाल पाटील यांचा प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात गाैरव

शिराळा : येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रजासत्ताक दिनी सांगली येथे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम प्रमुख उपस्थित होते.

विशाल पाटील यांनी नोव्हेंबर महिन्यात मांगले गावात झालेल्या घरफोडी चोरीतील मुद्देमाल व आरोपी दोन दिवसात पकडून या गुन्ह्याचा छडा लागला होता. मांगले येथील बंगला फोडून ३२ तोळे सोने, रोख व रक्कम मिळून जवळपास ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. याचा तपास जलद गतीने करत श्री. पाटील यांनी चोरट्यास मुद्देमालासह पकडले होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना विशाल पाटील यांनी यापूर्वी देखील शिराळा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास कौशल्यपूर्ण रीतीने केला आहे.

या सगळ्याची पोहोच पावती म्हणून त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सांगली येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पवार, कालिदास गावडे, चंद्रकांत कांबळे, विनोद जाधव, नितीन यादव, अरुण कानडे, स्नेहल कुंभार यांना देखील या कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

फोटो-२७शिराळा३

फोटो ओळ - सांगली येथे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गाैरविण्यात आले.

Web Title: Vishal Patil's absence in the Republic Day program