शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

आमदार, सरकारांच्या एकजुटीने खासदारांचा 'बालेकिल्ला' ढासळला; संजयकाकांच्या होमग्राउंडवर विशाल पाटलांना मताधिक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 19:08 IST

दत्ता पाटील तासगाव : सलग दोन निवडणुका खासदार पाटील यांचे होमग्राऊंड असलेल्या तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला ढासळला. ...

दत्ता पाटीलतासगाव : सलग दोन निवडणुका खासदार पाटील यांचे होमग्राऊंड असलेल्या तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला ढासळला. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना सुमारे ९ हजार ४११ मताधिक्य मिळाले. त्यामुळे खासदार पाटील यांचे लोकसभेसाठी हॅट्ट्रिक साधण्याचे स्वप्न भंगले.मात्र, निवडणुकीच्या सुरुवातीलाच माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी थेट खासदार पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली. अगदी सुरुवातीपासूनच घोरपडे यांनी विशाल पाटील यांच्यासाठी मैदानात उतरून खिंड लढवली. दुसरीकडे आमदार सुमनताई पाटील आणि युवानेते रोहित पाटील यांनी महाविकास आघाडीच्या स्टेजवर राहून विशाल पाटील यांना रसद पुरवली. त्यामुळेच तासगाव - कवठेमहांकाळ संजय पाटील यांचे होमग्राउंड असले तरी मतदारसंघातील दोन गट एकत्रित विरोधात आल्यामुळे आव्हान निर्माण झाले होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पडलेली मते 

  • संजय पाटील - ९४,९९२
  • गोपीचंद पडळकर - ५४,७८७
  • विशाल पाटील - ४८,०४३

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत पडलेली मते -

  • विशाल पाटील - ९५,४८६
  • संजय पाटील पाटील - ८५,०७४
  • चंद्रहार पाटील - ७,९४९

विजयाची कारणे 

  • विधानसभेसाठी भाजपकडून प्रभाकर पाटलांचे लाँचिंग केल्यामुळे ''आमचाच आमदार, आमचाच खासदार'' हा तासगाव तालुक्याचा पायंडा मोडीत निघाला.
  • विधानसभेची रंगीत तालीम म्हणून राष्ट्रवादीने यावेळी फाटी आखून विशाल पाटलांचे काम केले.
  • खासदार संजय पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत दगा दिल्याची भावना माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटात होती. त्यांचा पेरा फेडायचाच, असा चंग यावेळी घोरपडे गटाने बांधला. हा निर्णय विशाल पाटलांच्या पथ्यावर पडला.
  • एकीकडे महाविकास आघाडीने उमेदवारी डावलल्यामुळे निर्माण झालेली सहानुभूती आणि दुसरीकडे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी दादा घराण्याचे असलेल्या संबंधाची साद घातल्यामुळे निर्माण झालेले भावनिक वातावरण फायदेशीर ठरले.

पराभवाची कारणे 

  • लोकसभा निवडणुकीच्या आधीच विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्यामुळे राष्ट्रवादीने धास्ती घेत कडाडून विरोध केला.
  • बेरजेचे राजकारण करण्याऐवजी ''एकला चलो रे'' राजकारण करण्याच्या पद्धतीने तिसऱ्या आघाडीसह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी फारकत घेतली.
  • वर्चस्ववादाच्या अट्टाहासामुळे सलग दोन निवडणुका सहकार्य केलेल्या घोरपडे गटाशी शत्रुत्व निर्माण केले.
  • विकासाच्या मुद्याऐवजी भावनिक किनार देण्यात विरोधकांना यश मिळाले. याउलट खासदार पाटील यांनी केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवून ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर आणण्यात अपयश आले.
टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालsanjaykaka patilसंजयकाका पाटीलvishal patilविशाल पाटील