कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे भाजपसोबतच राहणार, विलासराव जगतापांनी केलं स्पष्ट 

By अशोक डोंबाळे | Published: April 22, 2023 06:01 PM2023-04-22T18:01:47+5:302023-04-22T18:02:34+5:30

विलासराव जगताप यांनी आपण भाजपच्या पॅनेलमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती

Vilasrao Jagtap clarified that he will stay with the BJP due to the insistence of the workers | कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे भाजपसोबतच राहणार, विलासराव जगतापांनी केलं स्पष्ट 

कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे भाजपसोबतच राहणार, विलासराव जगतापांनी केलं स्पष्ट 

googlenewsNext

जत : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव एक पाऊल मागे घेत सांगलीबाजार समिती निवडणुकीत भाजपसोबत राहणार आहे. कालचा निर्णय हा माझा वैयक्तिक होता. मात्र कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेनंतर आजपासून भाजपच्या पॅनेलचा प्रचार सुरू करणार आहे. याबाबत कुणीही संभ्रम बाळगू नये, असे प्रतिपादन जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.

खासदार संजय पाटील यांनी विश्वासघात करत भाजपच्या जत तालुकाध्यक्षांना उमेदवारी नाकारल्याने शुक्रवारी रात्री विलासराव जगताप यांनी आपण भाजपच्या पॅनेलमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती. यामुळे महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात असताना, शनिवारी भाजप पॅनेलचे उमेदवार व कार्यकर्त्यांची माजी आमदार विलासराव जगताप यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

यावेळी कार्यकर्त्यांनी विराेधकांना फायदा हाेऊ नये, यासाठी आपण एकसंध हाेऊन भाजपच्या पॅनेलमधूनच निवडणूक लढवू, अशी भूमिका जगताप यांच्यासमाेर मांडली. अखेर विलासराव जगताप यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भाजप पॅनेलमध्ये सक्रिय राहून पॅनेलच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.

जगताप म्हणाले, कालचा निर्णय हा माझा वैयक्तिक होता. आजपासून भाजपच्या पॅनेलचा प्रचार सुरू करणार आहोत. कुणीही संभ्रम बाळगू नये, आपले पॅनेल विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

Web Title: Vilasrao Jagtap clarified that he will stay with the BJP due to the insistence of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.