Sangli: भाजी खरेदीसाठी आलेल्या महिलांचे मोबाइलमध्ये करत होता चित्रण, विक्रेत्यास नागरिकांनी दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 12:35 IST2023-04-19T12:35:17+5:302023-04-19T12:35:44+5:30

विनयभंगाचा गुन्हा दाखल

Video shooting of women in mobile phones, Citizens gave chop to the seller in sangli | Sangli: भाजी खरेदीसाठी आलेल्या महिलांचे मोबाइलमध्ये करत होता चित्रण, विक्रेत्यास नागरिकांनी दिला चोप

Sangli: भाजी खरेदीसाठी आलेल्या महिलांचे मोबाइलमध्ये करत होता चित्रण, विक्रेत्यास नागरिकांनी दिला चोप

सांगली : शहरातील शंभरफुटी रस्त्यावर भाजी खरेदीसाठी आलेल्या महिलांचे मोबाइलमध्ये चोरून चित्रण करणाऱ्या विक्रेत्यास नागरिकांनी बदडले. संतप्त जमावाने त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. संतोष सुभाष कांबळे (वय ३३, रा. गांधीनगर, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पीडितेने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित कांबळे हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर येथील रहिवासी आहे. संतोष हा भाजी विक्रीसाठी आला होता. यावेळी या परिसरातील काही महिला भाजी घेण्यासाठी आल्या होत्या. संशयित कांबळे हा त्या महिलांचे चोरून मोबाइलमध्ये चित्रण करत होता.

यातील काही महिलांना संशय आल्याने त्यांनी इतरांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, कांबळे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Video shooting of women in mobile phones, Citizens gave chop to the seller in sangli