Video : अफवांवर विश्वास ठेऊ नका, आय एम फाईन, वैभव मांगलेंनी सांगितली 'आपबीती'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 22:28 IST2019-04-26T22:27:20+5:302019-04-26T22:28:36+5:30
सांगली येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात आज संध्याकाळी चार वाजता अलबत्या गलबत्या या नाटकाचा प्रयोग सुरू होता.

Video : अफवांवर विश्वास ठेऊ नका, आय एम फाईन, वैभव मांगलेंनी सांगितली 'आपबीती'
मुंबई - अभिनेता वैभव मांगले यांची प्रकृती उत्तम असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन मांगले यांनीच केले आहे. एका व्हिडीओद्वारे त्यांनी आपल्या प्रकृतीबाबत माहिती देत चाहत्यांना दिलासा दिला. मला हृदयविकाराचा झटका आला नसून केवळ थोडासा अशक्तपणा आहे. त्यामुळे चाहत्यांनी निश्चित राहावे, असे मांगले यानी म्हटले आहे.
वैभव मांगलेंनासांगली येथील क्रांती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अलबत्या गलबत्या या नाटकाच्या प्रयोगादरम्यान वैभव मांगले रंगमंचावर कोसळले. त्यांना भोवळ आल्याने डोळ्यासमोर काळोक पसरल्याचे ते म्हणाले. त्यानंतर, तात्काळ नाटकाचा प्रयोग थांबवण्यात आला. सांगलीत 43 डिग्री अंश सेल्सिय तापमान, त्यात सभागृहात एसी नसल्याने उकाडा निर्माण झाला. त्यामुळे मला अशक्तपणा आला असून मला कुठलाही ह्रदयविकाराचा झटका आला नाही. आय अम फाईन, तुम्ही सर्वांनी जी काळजी दाखवली, विचारपूस केली, त्याबद्दल सर्वांचे आभार असे म्हणत, वैभव मांगलेंनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सांगली येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात आज संध्याकाळी चार वाजता अलबत्या गलबत्या या नाटकाचा प्रयोग सुरू होता. या नाटकात चेटकीणीची मुख्य भूमिका वैभव मांगले करत आहे. या नाटकाला खूप गर्दी होती. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान वैभव मांगले रंगमंचावर कोसळले. थोड्या वेळाने त्याला चक्कर आली असे सांगून या नाटकाचा प्रयोग थांबवण्यात आला व तातडीने डॉक्टरांना बोलवण्यात आले.
व्हीडिओ -