शहाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST2021-02-05T07:28:42+5:302021-02-05T07:28:42+5:30

इस्लामपूर : शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि नगरपालिकेतील पाणीपुरवठा समितीचे सभापती, जय हनुमान नागरी पतसंस्थेचे कुुटुंबप्रमुख शहाजी पाटील यांच्या ...

Various activities on the occasion of Shahaji Patil's birthday | शहाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

शहाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

इस्लामपूर : शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि नगरपालिकेतील पाणीपुरवठा समितीचे सभापती, जय हनुमान नागरी पतसंस्थेचे कुुटुंबप्रमुख शहाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आशाराणी शहाजी पाटील यांनी हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने खेळ पैठणीचा या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

सोमवारी दि. १ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता संभुप्पा मठात हा कार्यक्रम होईल. पहिल्या पाच विजेत्यांना पैठणी दिली जाणार आहे. तर, उपस्थित महिलांमधून काढण्यात येणा-या भाग्यवान सोडतीतून १० महिलांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. याचवेळी प्रा.डॉ. सुरज चौगुले यांचे ‘जगणं सुंदर करता येतं’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

संभुअप्पा मठाजवळील विजयभाऊ पाटील हेल्थ क्लबमध्ये सकाळी ८ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता आंबेडकरनाका येथे वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण केले जाणार आहे. सकाळी ११ वाजता आंबेडकरनाका येथे स्लो सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Various activities on the occasion of Shahaji Patil's birthday