Sangli Accident: ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात दोघे युवक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:32 IST2025-03-03T13:32:17+5:302025-03-03T13:32:37+5:30

ट्रक चालक गेला पळून

Two youths were killed in a truck-bicycle accident near jat sangli district | Sangli Accident: ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात दोघे युवक ठार

Sangli Accident: ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात दोघे युवक ठार

विठ्ठल ऐनापुरे

जत : सांगोला महामार्गावर जतपासून चार किलोमीटर अंतरावर ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील देवदत्त दिलीप शिंदे (वय २०) व यशराज नाना शिंदे (वय १५, दोघे रा.शेगाव, ता. जत) हे दोघेजण ठार झाले. हा अपघात आज, सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला.

अपघातात मृत झालेला देवदत्त शिंदे हा तरूण चालक म्हणून काम करीत हाेता. तर यशराज हा इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. दोघेही शेगावमध्ये राहत होते. सोमवारी सकाळी दोघेजण दुचाकीवरून शेगाववरून जतकडे निघाले होते. जतपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सागर बाहुबली कापड दुकानाजवळ आले असता समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यशराज हा जागीच मृत झाला. गंभीर जखमी देवदत्तला जत ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र त्याचाही मृत झाला.

अपघातात दुचाकी ट्रकमध्ये घुसून चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक थांबवून तेथून पळ काढला. जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृत यशराजचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात आणला. अपघातात दोघे युवक मृत झाल्यामुळे शेगाव गावावर शोककळा पसरली आहे.

मृत यशराज आठवीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. अपघात झालेल्या मार्गावर सोळा चाकी व अठरा चाकी वाहने वेगाने जातात. त्यामुळे येथे अपघाताचा धोका वाढला असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Two youths were killed in a truck-bicycle accident near jat sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.