Accident: भरधाव वेगामुळे झाला घात, कडेगावात दुचाकी-ट्रॅक्टर अपघात दोघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 17:35 IST2022-03-19T17:34:06+5:302022-03-19T17:35:50+5:30

ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोराची धडक झाली. या अपघातात दोघांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. रक्तस्त्राव झाल्याने दोघे जागीच ठार झाले.

Two wheeler-tractor accident kills two on the spot in Kadegaon sangli | Accident: भरधाव वेगामुळे झाला घात, कडेगावात दुचाकी-ट्रॅक्टर अपघात दोघे जागीच ठार

Accident: भरधाव वेगामुळे झाला घात, कडेगावात दुचाकी-ट्रॅक्टर अपघात दोघे जागीच ठार

कडेगाव : कडेगाव शहरालगत विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका हॉटेल समोर ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली व दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात उत्तर प्रदेश येथील दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना काल, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.

रितेश राजकुमार विश्वकर्मा (वय-२६ मूळ रा. बौजापूर अमरहट) व वीरेंदर गोरखनाथ खरवार (३४ मूळ रा देनुवा, जैनापूर सध्या दोघे रा. कडेगाव औद्योगिक वसाहत) अशी मृतांची नावे आहेत. गौतम अनिल खरवार (वय १९ रा रामपूर उत्तरप्रदेश) याने याबाबत कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रितेश व वीरेंदर हे दोघे कडेगाव येथील अद्योगिक वसाहतीतील दत्त टेक्सटाईलमध्ये कामगार म्हणून गेले अनेक दिवसांपासून काम करीत होते. शुक्रवारी रात्री उशिरा दोघे दुचाकीवरुन (एम. एच. १० डीएल ३३४०) वगाने कडेगाव शहरातून अद्योगिक वसाहतीकडे कडेगाव-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरून निघाले होते. यावेळी समोरील ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची पाठीमागून जोराची धडक झाली. या अपघातात दोघांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. रक्तस्त्राव झाल्याने दोघे जागीच ठार झाले. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे करीत आहेत.

Web Title: Two wheeler-tractor accident kills two on the spot in Kadegaon sangli