शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: प्रशासकीय काळात दोन हजार भूखंडाचा शोध; लॅण्ड बँक तयार करण्याचा निर्धार - सत्यम गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 18:44 IST

सांगली : शहरातील महापालिकेच्या मालकीच्या १९४६ पासूनच्या मालमत्तांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १९९९ मालमत्ता सापडल्या असून, या ...

सांगली : शहरातील महापालिकेच्या मालकीच्या १९४६ पासूनच्या मालमत्तांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १९९९ मालमत्ता सापडल्या असून, या मालमत्तांच्या सातबारावर महापालिकेचे नाव लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालिकेच्या मालमत्तांचा शोध घेऊन 'लॅण्ड बॅक' तयार करणार असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले.आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, सांगली, मिरज व कुपवाड शहरातील तत्कालीन नगरपालिका व महापालिकेच्या मालकीच्या जागांचे १९४६ पासूनचे रेकॉर्ड तपासण्यात येत आहे. यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मालमत्ता विभागाकडे एक अभियंता नियुक्त करून, नोंदणी अधिकारी यांनी शोधलेले सातबारा उताऱ्याची खात्री करून समक्ष जागेवरील परिस्थितीनुसार मालमत्ता रजिस्टर करता येणार आहेत. केवळ नोंदणी अधिकारी हे काम करू शकत नसल्याने नगररचना विभागाची मदत घेण्यात येत आहे. महापालिकेच्या नावाचे उतारे असणारे मालमत्ता रजिस्टर नोंदणी अधिकारी यांच्याकडून करून घेण्यात येणार आहे. तसेच पालिकेचे नाव न लागलेल्या जागांची यादी नगररचना विभागाकडून तपासून नाव लावण्यासाठी प्रस्ताव तयार करून घेणे, नगरभूमापन विभागाकडे प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा करण्यासाठी टीम तयार करण्यात आली आहे. महापालिकेच्या जागांचा शोध घेऊन या जागांवर पालिकेचे नाव लावण्यात येणार आहे. अशा जागांची 'लॅण्ड बॅँक' तयार करण्यात येणार आहे.प्रशासकीय काळात १०० वर्षे भाड्याने दिलेली १२ कोटींची जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. होर्डिंग नियमित करून ७५ लाखाची वसुली केली. ४० वर्षे थकबाकी असलेल्या रुग्णालयाकडून १ कोटी ६० लाख वसूल केले. खोकी, गाळे यांच्या भाड्यात वाढ करून गतवर्षी तीन कोटींची वसुली केली. मिरजेतील आण्णा बुवा शाॅपिंग सेंटरचा वादही संपुष्टात आणला. वीज मंडळाला दिलेल्या भूखंडाच्या भाड्यापोटी अडीच कोटींची वसुली केली. नवीन जाहिरात धोरणाची अंमलबजावणी सुरू केल्याने महापालिकेला वार्षिक २१ कोटी रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे. महापालिकेच्या मालकीचे २४ प्लाॅट बेकायदेशीर हस्तांतरण केले होते. त्यावर अभिप्राय मागवून कार्यवाही केली जाणार असल्याचेही गांधी यांनी सांगितले.

मालमत्ताच्या सुरक्षेसाठी रक्षकांची नियुक्तीमहापालिकेच्या मालकीच्या ताब्यातील मालमत्तेच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून २८ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिकेची कार्यालये, सार्वजनिक स्थळांच्या सुरक्षा अधिक भक्कम केली जाईल, असेही गांधी यांनी सांगितले.

आरक्षित जागांचे प्रभागनिहाय भूसंपादनआयुक्त सत्यम गांधी म्हणाले, महापालिकेच्या 'लॅण्ड बॅँकेत' ओपन स्पेसही असणार आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या जागा भूसंपादित करण्यासाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात अशा जागांचा शोध घेतला जाईल. प्रभागनिहाय या जागांमधील आवश्यक असलेल्या जागांचे भूसंपादन करून त्या सार्वजनिक वापरात आणल्या जातील. त्यावरील आरक्षण विकसित केले जाणार आहे. जागा मालकास टीडीआर, एफएसआय व गरज असेल तिथे आर्थिक मोबदला दिला जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli finds land, creates land bank, recovers dues effectively.

Web Summary : Sangli Municipal Corporation is creating a land bank by identifying properties since 1946. They're securing ownership, recovering dues from defaulters, regularizing hoardings, and implementing new advertising policies to increase revenue. Security is being enhanced, and reserved spaces will be acquired for public use.