मिरजेत बनावट नोटाप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 21:39 IST2018-06-12T21:39:16+5:302018-06-12T21:39:16+5:30
मिरजेत बनावट नोटा जवळ बाळगल्याप्रकरणी गौस गब्बार मोमीन (वय २१, आझाद कॉलनी, मिरज) व शुभम संजय खामकर (रा. औद्योगिक वसाहत, सातारा) या दोघांना गांधी चौक पोलिसांनी अटक केली

मिरजेत बनावट नोटाप्रकरणी दोघांना अटक
मिरज : मिरजेत बनावट नोटा जवळ बाळगल्याप्रकरणी गौस गब्बार मोमीन (वय २१, आझाद कॉलनी, मिरज) व शुभम संजय खामकर (रा. औद्योगिक वसाहत, सातारा) या दोघांना गांधी चौक पोलिसांनी अटक केली. शुभम खामकर याने या बनावट नोटा खपविण्यासाठी गौस मोमीन याच्याकडे दिल्या होत्या.
याची माहिती गांधी चौक पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या १७ अशा ८ हजार ५०० च्या बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी ही कारवाई सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अरफा हॉटेल बाहेर केली. बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी मोमीन व खामकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.
त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १४ पर्यंत तीन दिवस पोलीस कोठडी दिली. पोलिसांनी बनावट नोटाप्रकरणी तपास सुरू केला आहे. तपासात बनावट नोटा खपविणारी टोळी उघडकीस येण्याची शक्यता आहे.