शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

टेम्पोची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक, अपघातानंतर टेम्पोला आग; सांगली जिल्ह्यातील दोघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:01 IST

मंडप सजावटीचे साहित्य आणण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकवर काळाचा घाला

कवठेमहांकाळ : धुळे येथे मंडप सजावटीचे साहित्य स्वस्त दरात खरेदी करण्यासाठी जात असताना सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील मंडप व्यवसायिकांवर रविवारी पहाटे गल्ले बोरगाव (ता. खुलताबाद, जि. संभाजीनगर) गावच्या हद्दीत काळाने घाला घातला. पहाटेच्या सुमारास त्यांच्या टेम्पोने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. यानंतर टेम्पोने पेट घेतला. या गंभीर अपघातामध्ये दोन मंडप व्यवसायिक जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला.विनायक जालिंदर पाटील (वय ४७ रा. शिरढोण, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) आणि दादासाहेब बाजीराव देशमुख (वय ३५, रा. अंजनी ता. तासगाव, जि. सांगली) अशी मयत व्यवसायिकांची नावे आहेत. तर सलीम अब्दूल मुलाणी (वय ४३, रा. मळणगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) हा मंडप व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर संभाजीनर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये येथे उपचार सुरु आहेत. या अपघाताची खुलताबाद पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.याबाबत माहिती अशी की, धुळे येथे मंडप सजावटीचे साहित्य स्वस्त दरात घेण्यासाठी मंडप व्यावसायिक विनायक पाटील, दादासाहेब देशमुख, सलीम मुलाणी हे तिघे शनिवारी सायंकाळी मोटार (क्र. एम. एच ०४ एच डी - ३०४९) मधून धुळेकडे निघाले होते. विनायक पाटील गाडी चालक होते आणि सलीम मुल्ला बाजूला बसलेले होते. तर दादासाहेब देशमुख हे मोटारीच्या पाठीमागील बाजूस झोपी गेलेले होते. रविवारी पहाटे धुळे - सोलापूर मार्गावरील खुलताबाद तालुक्यात गल्ले बोरगाव गावाच्या हद्दीत छोटा हत्तीने रस्त्यालगत उभा असलेल्या ट्राॅलीस पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की गाडीमध्ये समोरील बाजूला बसलेले दोघे वाहनात अडकले. यावेळी सलीम अब्दूल मुलाणी यांनी बचतीसाठी आरडाओरड सुरु केली. अपघातीची माहिती मिळताच महामार्ग पोलिसानी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली. सुरुवातीला सलीम मुलाणी याला बाहर काढण्यात आले. चालकास बाहेर काढता येत नव्हते. त्यासाठी मळीची ट्राॅली हलविण्यात आली. नेमक्या याच वेळी छोटा हत्ती गाडीने पेट घेतला.पोलिसांनी पाठीमागील बाजूच्या हौद्यामध्ये असलेल्या दादासो देशमुख आणि सलीम यांना रुग्णवाहिकेमधून तातडीने संभाजीनगरकडे पाठविण्यात आले. छोटा हत्तीने पेट घेतल्याने चालक विनायक पाटील यांना बाहेर काढण्यात पोलिसांना अपयश आले. कांही क्षणातच आग विझविण्यात यश आले तोपर्यंत विनायक पाटील यांचा होरपळून मृत्यू झाला होता.संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दोन गंभीर जखमींना आणणेत आलेनंतर डॉक्टरांनी दादासो देशमुख यास मृत घोषित करण्यात आले. सलीम मुलाणी यांचेवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू