कोर्टाची तारीख चुकवल्याने दोघा आरोपींची हाणामारी, मिरजेत दोन गट भिडल्याने नागरिकांचीही उडाली धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 14:13 IST2022-02-09T14:12:51+5:302022-02-09T14:13:34+5:30

कोर्टात सुनावणीसाठी उपस्थित राहत नसल्याने दुसऱ्या आरोपीचा संताप अनावर

Two accused fight in Miraj over missing court date | कोर्टाची तारीख चुकवल्याने दोघा आरोपींची हाणामारी, मिरजेत दोन गट भिडल्याने नागरिकांचीही उडाली धावपळ

कोर्टाची तारीख चुकवल्याने दोघा आरोपींची हाणामारी, मिरजेत दोन गट भिडल्याने नागरिकांचीही उडाली धावपळ

मिरज : मिरजेत शेतकरी चौकात दोघा नशेखोर गुन्हेगारांत सोमवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. तरुणांचे दोन गट भिडल्याने नागरिकांचीही धावपळ उडाली. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शेतकरी चौकात दोघेही खुनातील दोघा आरोपींची तात्पूरत्या जामिनावर मुक्तता झाली आहे. मात्र कोर्टात सुनावणीसाठी एका नशेखोर तरुण उपस्थित राहत नसल्याने दुसऱ्या आरोपीचा संताप अनावर झाला.

त्याने सोमवारी रात्री कोर्टात तारखेला हजर राहत नसल्याबद्दल दुसऱ्याला जाब विचारला. यातून दोघात मारामारी सुरू झाल्यानंतर त्यांचे साथीदारही एकमेकांना भिडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नशेखोरांना ताब्यात घेत गर्दी पांगविली.

Web Title: Two accused fight in Miraj over missing court date