दिघंचीत पंधरा दिवसांत बारा सापांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST2021-02-05T07:26:07+5:302021-02-05T07:26:07+5:30

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे दिवसेंदिवस विषारी साप आढळून येण्याचे प्रमाण वाढत आहे. दिघंचीसह परिसरात पंधरा ...

Twelve snakes were saved in a fortnight | दिघंचीत पंधरा दिवसांत बारा सापांना जीवदान

दिघंचीत पंधरा दिवसांत बारा सापांना जीवदान

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे दिवसेंदिवस विषारी साप आढळून येण्याचे प्रमाण वाढत आहे. दिघंचीसह परिसरात पंधरा दिवसांत सर्पमित्र श्रीनाथ मिसाळ यांनी नऊ नाग व तीन घोणस जातीच्या विषारी सापांना जीवदान दिले आहे.

दिघंचीतील साळशिंगमळा, भाकर ओढा, पेट्रोल पंप परिसर या परिसरात विषारी साप आढळून आले आहेत. सर्पमित्र श्रीनाथ मिसाळ यांनी त्या सापांना जीवदान दिले आहे. दिघंची परिसरात कोठे साप निघाला तर मिसाळ हे तेथे जाऊन सापाला काठीच्या व चिमट्याच्या साहाय्याने पकडून सुरक्षितस्थळी सोडतात. यासाठी त्यांना त्यांचे मित्र ऋतुराज देशमुख हे मदत करीत आहेत.

कोट

दिघंची परिसरात विषारी सापांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी. परिसरात कोठेही साप निघाला तर त्याला मारण्याऐवजी सर्पमित्रांना बोलावून सुरक्षित स्थळी सोडावे.

- श्रीनाथ मिसाळ. सर्पमित्र, दिघंची

फोटो-३१दिघंची१ व २

फोटो ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथे सर्पमित्र श्रीनाथ मिसाळ यांनी विषारी नागाला पकडून सुरक्षितस्थळी सोडले.

Web Title: Twelve snakes were saved in a fortnight