Sangli Crime: परताव्याला भुलले.. इस्लामपुरातील बारा जणांची एक कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:04 IST2025-06-14T13:03:49+5:302025-06-14T13:04:20+5:30

१० जणांच्या ठकबाज टोळीविरुद्ध गुन्हा दाखल

Twelve people in Islampur were cheated of Rs 1 crore 36 lakhs on the pretext of giving extra refunds | Sangli Crime: परताव्याला भुलले.. इस्लामपुरातील बारा जणांची एक कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक

Sangli Crime: परताव्याला भुलले.. इस्लामपुरातील बारा जणांची एक कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक

इस्लामपूर (जि. सांगली) : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत ठकबाज टोळीने इस्लामपूर शहरातील १२ जणांना तब्बल १ कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली. फसवणुकीचा हा प्रकार एप्रिल २२ ते एप्रिल २०२४ या कालावधीत घडला आहे.

याबाबत संतोष बाळासाहेब पाटील (३८, रा. किसाननगर-इस्लामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विराज सुहास पाटील (दहिसर-मुंबई), फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी जोसेफ, प्रियंका खन्ना (दोघे रा. पंजाब), डॉ. नीलेश नरेशराव राऊत, सूरज सुधाकर सावरकर, सुरेंद्र मधुकर सावरकर (रा. झडशी टाकळी, जि. वर्धा), प्रीती नीलेश राऊत (वर्धा), सॅविओ परेरा (रा. विरार वेस्ट, जि. पालघर) व इतर ब्रोकर आणि एजंट अशा १० हून अधिक जणांच्या टोळीविरुद्ध फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरील भामट्यांच्या टोळीने इस्लामपूर शहरातील दोन पॉश हॉटेलमध्ये गुंतवणूक करण्यासाठीची चर्चासत्रे घेत संतोष पाटील यांच्यासह अन्य १२ जणांचा विश्वास संपादन करत आपल्या जाळ्यात ओढले. या सर्वांना फॉरेक्स ट्रेडिंगच्या विविध ॲप आणि वेबसाइटवर गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्याला हे १२ जण फशी पडले.

गुंतवणूकदारांना ठकबाजांचा ठेंगा

एप्रिल २२ ते एप्रिल २०२४ या दोन वर्षांच्या काळात या सर्वांनी तब्बल १ कोटी ३६ लाख २२ हजार रुपयांची गुंतवणूक या भामट्यांच्या टोळीने सांगितलेल्या विविध बँक खात्यावर केली. गुंतवणूक केल्यानंतर त्याचा परतावा मिळण्यासाठी या सर्वांनी तगादा लावला होता. मात्र त्यांना या ठकबाजांनी ठेंगा दाखवल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे शहरातील या सर्वांनी पोलिसात धाव घेतली.

Web Title: Twelve people in Islampur were cheated of Rs 1 crore 36 lakhs on the pretext of giving extra refunds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.