शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सातशेवर तळीरामांचे वाहन परवाने निलंबित

By admin | Updated: November 17, 2014 23:21 IST

मद्यधुंद सवारी भोवली : पोलिसांच्या प्रस्तावानुसार कारवाई

सचिन लाड - सांगली -दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांना न्यायालय व उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी कारवाईसाठी सादर केलेल्या प्रस्तावातील ७०० तळीरामांचा वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) निलंबित केला आहे. न्यायालय व आरटीओंनी स्वतंत्रपणे दोन ते सहा महिन्यांपर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तळीरामांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दारूच्या नशेत वाहन चालविल्याने अपघात होतात. वाहनधारक स्वत:सह दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकतात. अनेक अपघात वाहनधारक नशेत असल्यामुळेच झाले आहेत. नशेत वाहन चालविणे धोक्याचे असूनही वाहनधारक सर्रासपणे हा धोका पत्करतात. नेहमीपेक्षा ते भरधाव वेगाने जातात. त्यांच्या नशेतील सवारीला ‘ब्रेक’ बसावा, या हेतूने जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दोन वर्षांपूर्वी विशेष मोहीम उघडली. तळीरामांची वाहने जप्त केली जातात. रात्रभर त्यांना पोलीस कोठडीत ठेवले जाते. दुसऱ्यादिवशी दुपारी तीन वाजता न्यायालयात उभे केले जाते. त्यांचे लायसन्सही जप्त केले जाते. या कारवाईमुळे अपघातासह अन्य गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसल्याचे दिसून येते. पोलीस कधीही नाकाबंदी लावून धरपकड करीत असल्याची भीती मद्यपींमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे रात्री दहानंतर रस्त्यावर शुकशुकाट असतो. पूर्वी दारूचे सेवन केले आहे का नाही, याची तपासणी करण्यासाठी वाहनधारकास शासकीय रुग्णालयात नेले जात होते; मात्र आता पोलिसांकडे अत्याधुनिक नऊ यंत्रे आली आहेत. हे यंत्र वाहनधारकाजवळ नेल्यानंतर त्याने दारूचे सेवन केले आहे का नाही, हे लगेच समजते. गेल्या वर्षभरात पोलिसांनी ७०० तळीरामांना अटक केली. त्यांचे लायसन्स निलंबित करावे, असा एकत्रित प्रस्ताव जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी तत्कालीन आरटीओ हरिश्चंद्र गडसिंग यांना सादर केला होता. गडसिंग यांनी स्वत: यातील सहाशे जणांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. उर्वरित १०४ जणांचे प्रस्ताव जिल्हा न्यायालयात पाठविण्यात आले होते. आता लायसन्स रद्द होणारअनेक तळीराम दोन ते तीनवेळा सापडले. त्यांचे लायसन्सही निलंबित करण्यात आले होते. मात्र तरीही ते पुन्हा नाकाबंदीत सापडत आहेत. त्यामुळे आता त्यांचे लायसन्स कायमस्वरुपी रद्द करण्यासाठी पोलीसप्रमुखांचा विचार सुरू आहे. गेल्या दोन वर्षात तीन ते चारवेळा सापडलेल्या तळीरामांचे रेकॉर्ड काढण्याचे काम सुरू आहे.