शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरमध्ये ट्रामा सेंटर उभारणार

By admin | Updated: December 29, 2016 00:33 IST

दीपक सावंत : इस्लामपुरात महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

इस्लामपूर : महिला, मुली आणि मूकबधिरांवरील उपचारासह लठ्ठपणाविरोधी अभियान राज्यभरात राबविणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे बुधवारी जाहीर केले, तर इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयाची श्रेणी वाढवून येथील ट्रामा केअर युनिटसाठी टप्प्या-टप्प्याने निधी देऊ, अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. शासनाचा आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग आणि येथील प्रकाश मेडिकल हॉस्पिटलतर्फे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन महाजन यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. खा. राजू शेट्टी, खा. संजयकाका पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, डॉ. तात्याराव लहाने, आ. शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. महाजन म्हणाले की, शासनाने शस्त्रक्रिया आणि उपचाराचा सर्व खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या महाआरोग्य शिबिरातून शस्त्रक्रिया कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या नावे दोन लाख तातडीने वर्ग करण्यात येतात. यापुढे महिला-मुलींमध्ये वाढत असलेल्या स्तनाच्या, छातीच्या कर्करोगाविरुध्द निदान व संपूर्ण मोफत उपचार करणारे विशेष अभियान लठ्ठपणाविरोधी अभियान आणि मूकबधिर सक्षम अभियान राज्यभरात राबवणार आहोत. डॉ. सावंत म्हणाले की, प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कर्करोग निदान केंद्र सुरू करणार आहोत. इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाची श्रेणी वाढवून येथील ट्रामा केअर युनिटसाठी टप्प्या-टप्प्याने निधी देऊ. संयोजक कृषी राज्यमंत्री खोत म्हणाले की, शासन रुग्णसेवेला प्राधान्य देत ‘डॉक्टर रुग्णाच्या दारी’ अभियान राबवत आहे. मंत्र्यांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ५0 वाढीव कॉटना मंजुरी तसेच ट्रामा केअर युनिटसाठी पाच कोटींचा निधी द्यावा. नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले की, शिबिरात १६ हजाराहून अधिक रुग्णांची नोंदणी झाली आहे. चार हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. डॉ. राम हंकारे यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक विक्रम पाटील, वैभव पवार, गोपीचंद पडळकर, आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी. मुगडे, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, अजित पाटील, नगरसेवक अमित ओसवाल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, शकील सय्यद, प्रसाद पाटील, डॉ. जयश्री तोडकर, नितीन पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, तहसीलदार सविता लष्करे, बाळासाहेब जाधव, भास्कर कदम, रियाज पटेल, धैर्यशील मोरे उपस्थित होते. (वार्ताहर) संजयकाकांना यशाचा कानमंत्र गिरीश महाजन यांनी राजकारणातील यशाचा कानमंत्र दिला. ते म्हणाले की, मी गेली २५ वर्षे आमदार आहे. या काळात दोन लाख रुग्णांवर मोफत उपचार करुन त्यांना सुखरुपपणे घरी पोहोचवले आहे. राजकारणाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासा. रुग्णसेवा हा मंत्र जोपासला तर संजयकाका, तुम्ही ५- ७ टर्म तरी हलणार नाही! मंत्री, आमदार-खासदारांचे देहदान अर्ज आ. शिवाजीराव नाईक, खा. संजयकाका पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी देहदान व अवयव दानाचे स्वेच्छा अर्ज मंत्री महाजन व डॉ. सावंत यांच्याकडे सुपूर्द केले. याचवेळी अपघातात ‘ब्रेन डेड’ झालेल्या मुलाचे अवयवदान करणाऱ्या शिवाजी जाधव आणि डॉ. नीलिमा शिंदे यांचा गौरव करण्यात आला.