शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Election 2026: सांगली महापालिकेत सात जागांवर ‘हाय होल्टेज’ सामना, कोण कुणाशी भिडणार... वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:03 IST

भाजपविरुद्ध इतर पक्षातील उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर 

सांगली : महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजप विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगलेला दिसत आहे. या निवडणुकीत भाजपने सर्व प्रभागांत उमेदवार दिले आहेत. परंतु, एकूण २० प्रभागांतील सात जागांवर भाजप उमेदवारांची ‘वन टू वन’ अर्थात कांटे की टक्कर, आरपारची लढाई होत आहे. या सात जागांवरील लढती म्हणजे ‘हाय होल्टेज’ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सात जागांच्या निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे.महापालिका स्थापनेनंतरच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा चुरस निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी अशी लढत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, महायुतीमधील मित्र पक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा फिस्कटली. भाजपने सर्व ७८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे येथे भाजप विरुद्ध प्रमुख पक्ष अशी लढत होत आहे. प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर २० प्रभागांतील ‘हाय होल्टेज’ लढतींची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.अनेक प्रभागांत तिरंगी, चौरंगी लढती होत असताना सात जागांवर मात्र थेट लढत होत आहे. नेते मंडळींनी हा योग घडवून आणल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या मिरजेतील प्रभाग ४ (ड)मधील निरंजन आवटी (भाजप) विरुद्ध शैलेंद्र देशपांडे (राष्ट्रवादी अजित पवार पुरस्कृत), प्रभाग ९ (ब) मध्ये वर्षा सरगर (भाजप) विरुद्ध वृषाली पाटील (राष्ट्रवादी शरद पवार), प्रभाग ९ (क) रोहिणी पाटील (भाजप) विरुद्ध आसमा फकीर (काँग्रेस), प्रभाग ११ (ड) मनोज सरगर (भाजप) विरुद्ध हर्षवर्धन पाटील (काँग्रेस), प्रभाग १३ (अ) महाबळेश्वर चौगुले (भाजप) विरुद्ध अभिजित कोळी (राष्ट्रवादी शरद पवार), प्रभाग १४ (ब) उदय बेलवलकर (भाजप) विरुद्ध शीतल सदलगे (शिंदेसेना), प्रभाग १६ (ब) विद्या दानोळे (भाजप) विरुद्ध सलमा शिकलगार (काँग्रेस) या सात लढती ‘वन टू वन’ अशा होत आहेत.महापालिका निवडणुकीपूर्वी अनेकांनी भाजपमध्ये तिकिटासाठी प्रवेश केला आहे. काहींनी अपेक्षेप्रमाणे तिकीट मिळविले आहे. भाजपने सर्व प्रभागांत उमेदवार उभे केले असले तरी त्यांच्या सात उमेदवारांना थेट लढत द्यावी लागणार आहे. या ठिकाणी उमेदवारांचा थेट सामना असल्यामुळे दोन्ही उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून प्रचारास प्रारंभ केला आहे. तर या सात लढतींमधील उमेदवारांच्या समर्थकांना रात्रंदिवस एक करावा लागत आहे. उमेदवाराची प्रतिष्ठा ती आपली प्रतिष्ठा समजून कार्यकर्त्यांनी प्रचारास प्रारंभ केला आहे.

या लढतीकडे जिल्ह्याचे लक्षप्रभाग ११ (ड) मध्ये काँग्रेसमधून भाजपत आलेले खासदार विशाल पाटील यांचे एकेकाळचे खंदे समर्थक मनोज सरगर यांच्याविरोधात वसंतदादांचे पणतू हर्षवर्धन पाटील यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीतील ही सर्वांत मोठी हाय होल्टेज लढत मानली जाते. या प्रभागात नाराजांच्या फोडाफोडीचे राजकारण सध्या रंगले आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे.

समर्थकांची प्रतिष्ठा पणालायंदाची महापालिका निवडणूक चुरशीने होत असली तरी सात जागांवरील लढतीकडे अनेकांचे लक्ष आहे. या ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रभागातील हालचालींकडे ते लक्ष ठेवून आहेत. एकगठ्ठा मतदान आपल्याकडे वळविण्याकडे कल दिसून येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Corporation Election 2026: High-Voltage Battles on Seven Seats

Web Summary : Sangli's municipal election sees BJP facing tough competition on seven key seats. All eyes are on these 'high voltage' contests as direct battles intensify. Key candidates from various parties are vying for victory, making it a closely watched election.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी