शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

कारंदवाडीत जाळीत अडकलेल्या मगरीच्या सुटकेचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 18:49 IST

crocodile , wildlife, sangli कृष्णाकाठावर गेल्या काही वर्षांत मगर व माणसांचा संघर्ष तीव्र झाला आहे. या दोहोंकडून परस्परांचे प्राण घेण्यापर्यंत घडामोडी घडल्या आहेत. पण अनेकदा मगरींना जीवदान देण्याची भूतदयादेखील नागरीकांनी दाखविली आहे. कारंडवाडीमध्ये (ता. वाळवा) येथील शेतकर्यांनी शुक्रवारी असेच प्राणीप्रेम दाखवत एका मगरीची जाळीतून सुटका केली.

ठळक मुद्देकारंदवाडीत जाळीत अडकलेल्या मगरीच्या सुटकेचा थरारमच्छिमारांचा उत्साह मगरींच्या जीवावर

सांगली : कृष्णाकाठावर गेल्या काही वर्षांत मगर व माणसांचा संघर्ष तीव्र झाला आहे. या दोहोंकडून परस्परांचे प्राण घेण्यापर्यंत घडामोडी घडल्या आहेत. पण अनेकदा मगरींना जीवदान देण्याची भूतदयादेखील नागरीकांनी दाखविली आहे. कारंडवाडीमध्ये (ता. वाळवा) येथील शेतकर्यांनी शुक्रवारी असेच प्राणीप्रेम दाखवत एका मगरीची जाळीतून सुटका केली.कारंदवाडीमधील हाळभागात शेतकरी प्रभाकर पाटील हे कृष्णा नदीत मोटारीच्या कामासाठी गेले असता पाण्यात तडफडणारी मगर त्यांना दिसली. मच्छिमारांनी मासे पकडण्यासाठी पूर्ण पात्रात नदीला आडवी जाळी लावली होती. प्रवाहासोबत पोहत आलेली मगर जाळीत अडकली. सुटण्यासाठी धडपड करताना आणखी फसत गेली.प्रभाकर पाटील व अभिजित पाटील यांनी तिच्या सुटकेसाठी प्रयत्न केला. काईलीतून नदीच्या पलीकडील तिरावर गेले. तेथून जाळे कापले. जाळ्यासह मगरीला पात्राबाहेर जमिनीवर आणले. पण माणसांची चाहूल लागताच मगर हिंस्त्र बनू लागली, त्यामुळे तिला जाळीतून सोडविणे पाटील यांना शक्य झाले नाही. त्यांनी सांगतील ॲनिमल राहत संस्थेला कळविले. तेथून कार्यकर्ते येईपर्यंत मगरीच्या चेहर्यावर टॉवेल टाकून शांत करण्याचा प्रयत्न केला.राहतच्या कौस्तुभ पोळ, योगेश इनामदार, प्रसाद सूर्यवंशी यांनी मगरीवर नियंत्रण मिळवित जाळी कात्रीने कापली. विशेषत: तिच्या तोंडाजवळची जाळी कापणे धाडसाचेच होते. सुमारे पाच फूट लांबीच्या मगरीची अर्ध्या-पाऊण तासांनंतर सुटका झाली. जाळी पूर्ण निघाल्याची खात्री झाल्यानंतर टॉवेल काढण्यात आला. त्याचक्षणी तिने नदीपात्राकडे धाव घेतली.मच्छिमारांचा उत्साह मगरींच्या जीवावरकृष्णा नदीपात्रात सध्या मुबलक पाणी असल्याने मासेमारीला उधाण आले आहे. अशास्त्रीय पद्धतीने मासेमारी होत असल्याने मगरींचे प्राण धोक्यात येताहेत. दोनच दिवसांपूर्वी अंकलखोपमध्येही कृष्णेत एका जाळ्यात मोठी मगर अडकल्याचे दिसून आले, तिची सुटका अजूनही झालेली नाहीजाळ्यात अडकलेल्या स्थितीतच ती नदीपात्रत वावरत आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवSangliसांगली