शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

मेंढ्या चोरणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:40 AM

तासगाव : शिरगाव- कवठे (ता. तासगाव) येथून तीन मेंढ्या चोरल्याप्रकरणी कवठेएकंद येथील तीन जणांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. ...

तासगाव : शिरगाव- कवठे (ता. तासगाव) येथून तीन मेंढ्या चोरल्याप्रकरणी कवठेएकंद येथील तीन जणांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मेंढपाळ रघुनाथ तातोबा शेळके (रा. कण्हेरीवाडी, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर) यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

अटक केलेल्यांत बजरंग रंगराव शिरतोडे, राहुल जाधव व प्रकाश शिरतोडे

(तिघे, रा. कवठेएकंद) यांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांतून मिळलेली माहिती अशी की, शेळके यांच्या छत्तीस हजार रुपये किमतीच्या तीन मेंढ्या बुधवारी रात्री चोरीस गेल्या होत्या. या चोरीबाबत पोलिसांनी तातडीने हालचाली करून या तीन संशयितांना तातडीने अटक केली आहे.

हातनोली येथे जमीन वादातून जनावरांना मारले

तासगाव :

हातनोली (ता. तासगाव) येथे जमीन वादातून एका महिलेने तीन म्हशी, एक रेडकू व एक गाय युरिया चारून मारल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. माणकाबाई बाळासाहेब जाधव यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

शारदा उत्तम जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. माणकाबाई आणि शारदा यांच्यात जमिनीचा जुना वाद आहे. या वादातून चिडून जाऊन शारदाने गव्हाच्या पिठाच्या कणिकमधून युरिया मिसळून माणकाबाई यांच्या तीन म्हशी, एक रेडकू, दोन गायी यांना चारले. यात तीन म्हशी एक रेडकू व एक गाय मृत्युमुखी पडली आहे, तर एक गायीवर उपचार सुरू आहेत.