Sangli: 'वैद्यकीय'च्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना सहा दिवस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 17:22 IST2025-05-23T17:21:39+5:302025-05-23T17:22:44+5:30

गुंगीकारक शीतपेय पाजून केला बलात्कार

Three men who gang raped a medical student remanded in custody for six days | Sangli: 'वैद्यकीय'च्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना सहा दिवस कोठडी

Sangli: 'वैद्यकीय'च्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना सहा दिवस कोठडी

सांगली : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीला गुंगीकारक पेय पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना सहा दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पुराव्यांची नोंद घेतली.

विनय विश्वेष पाटील (वय २२, रा. महिपती निवास, अंतरोळीकर नगर, सोलापूर शहर), सर्वज्ञ संतोष गायकवाड (२०, रा. एफ ६०५, सरगम, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) आणि तन्मय सुकुमार पेडणेकर (२१, रा. ३०३ कासाली व्हिला, अभयनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने मित्राच्या खोलीवर आणले. तेथे तिला गुंगीकारक शीतपेय पाजून बलात्कार केला. याप्रकरणी तिने पोलिसांत ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तिन्ही संशयितांना तत्काळ अटक केली. आज, त्यांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवस कोठडी सुनावली. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव करत आहेत.

Web Title: Three men who gang raped a medical student remanded in custody for six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.