टेम्पो व कारची समोरा समोर धडक, उमदीचे तिघे ठार तर चौघेजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 12:44 IST2021-12-25T12:41:28+5:302021-12-25T12:44:47+5:30

हा अपघात एवढा भीषण होता तिघेजण जागीच ठार झाले.

Three killed four injured in head on collision between tempo and car in solapur | टेम्पो व कारची समोरा समोर धडक, उमदीचे तिघे ठार तर चौघेजण गंभीर जखमी

टेम्पो व कारची समोरा समोर धडक, उमदीचे तिघे ठार तर चौघेजण गंभीर जखमी

उमदी : जत तालुक्यातील उमदी येथील चारचाकी गाडीचा भीषण अपघात होऊन तिघेजण जागीच ठार झाले तर चौघे जण गंभीररीत्या जखमी झाले. सोलापूर जिल्ह्यातील ब्रम्हपुर या गावाजवळ आज, शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास हा अपघात झाला.

उमदी तालुका जत येथील अनेक जण हैदराबाद या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूर जवळील ब्रम्हपुर या गावाजवळ शनिवारी पहाटे आयशर टेम्पो व कारची समोरा समोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता तिघेजण जागीच ठार झाले.

मौलाना साजिद खान (वय-३५), जैनुद्दीन यादगिरी (३८) व गाडीचा चालक प्रवीण हिरेमठ (२४) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. आणखी चौघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत जखमींमध्ये काँग्रेस नेते वहाब मुल्ला यांचाही समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच उमदी येथील प्रमुख नेते व कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या दुर्घटनेमुळे उमदी गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Three killed four injured in head on collision between tempo and car in solapur