सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकालांची नोंद होत असून अनेकठिकाणी क्रॉस व्होटिंगचे प्रकार स्पष्ट झाले आहेत. कुपवाडमधील प्रभाग क्रमांक दोनमध्ये असाच प्रकार दिसून आला. भाजपचे तीन उमेदवार या प्रभागात विजयी झाले, मात्र पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले प्रकाश ढंग यांना पराभवाचा धक्का बसला. बिग फाईट म्हणून येथील लढतीकडे पाहिले जात होते. याठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जोराची लढत झाली. भाजपच्या प्राजक्ता धोत्रे, मालुश्री खोत व प्रकाश पाटील हे तीन उमेदवार विजयी झाले, मात्र याच प्रभागातील ब गटातून भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग पराभूत झाले. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी पराभूत केले. २०१८ च्या निवडणुकीत मगदुम हे अपक्ष म्हणून निवडून आले होते.
Web Summary : In Sangli's Kupwad, BJP secured three wins, but city president Prakash Dhang lost to NCP's Gajanan Magdum despite a strong fight. Cross-voting suspected.
Web Summary : सांगली के कुपवाड़ में भाजपा ने तीन सीटें जीतीं, लेकिन शहर अध्यक्ष प्रकाश ढंग राकांपा के गजानन मगदूम से हार गए। क्रॉस-वोटिंग का संदेह है।