कोल्हापुरातून तीन जादा रेल्वे गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:16 IST2025-08-30T13:13:02+5:302025-08-30T13:16:10+5:30

रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार

Three additional trains will run from Kolhapur on the occasion of Dussehra and Diwali | कोल्हापुरातून तीन जादा रेल्वे गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक

संग्रहित छाया

सांगली : दसरा व दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेनेकोल्हापूर, मिरज, सांगली मार्गे कटीहारसाठी गाडी क्रमांक ०१४०५ व ०१४०६ सुरू केली आहे. ती १४ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान दर रविवारी कोल्हापूर येथून सकाळी ९:३५ वाजता सुटेल. 

कोल्हापूर ते मुंबईसाठी गाडी क्रमांक ०१४१७ व ०१४१८ साप्ताहिक गाडी सोडण्यात आली आहे. ती दर बुधवारी रात्री १० वाजता कोल्हापुरातून सुटेल. २४ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबरअखेर ती धावणार आहे. 

गाडी क्रमांक ०१२०९ व ०१२१० ही कोल्हापूर ते कलबुर्गी ही गाडी सकाळच्या सत्रात धावणार आहे. मिरज, पंढरपूर, सोलापूर मार्गे कलबुर्गीला जाईल. २४ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर हा तिचा कालावधी आहे. शुक्रवार वगळता, सर्व दिवस सकाळी ६:१० वाजता कोल्हापुरातून सुटेल.

Web Title: Three additional trains will run from Kolhapur on the occasion of Dussehra and Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.